संगमेश्वर आठवडा बाजारातील अडथळे हटवले

संगमेश्वर आठवडा बाजारातील अडथळे हटवले

१६ (टुडे पान ३ साठी)

- rat१४p५.jpg -
OP२४M८३५१५
संगमेश्वर ः आठवडाबाजारातील अडथळे हटवल्यामुळे मोकळा झालेला रस्ता.
---------

संगमेश्वर बाजारातील अडथळे हटवले

संगमेश्वर, ता. १४ ः संगमेश्वर आठवडा बाजारपेठेमध्ये विविध मालाची विक्री करण्यासाठी येत असलेल्या व्यापाऱ्यांकडून आठवडा बाजारपेठेमध्ये उभारण्यात आलेले अडथळे अखेर हटवण्यात आले आहेत.
संगमेश्वरचा बुधवार आठवडा बाजारचा दिवस असतो. बुधवार झाला की काहीजण वर्दळीच्या रस्त्यावरच अडथळा निर्माण करून निघून जात होते. जनतेला याचा नाहक त्रास सहन करायला लागत होता. रात्री वीज प्रवाह खंडित झाला की अशा अडथळ्यामुळे अपघात होऊन कायमचे जायबंदी होऊन घरी बसावं लागण्याची शक्यता होती. याबाबत रामपेठ येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल शेट्ये यांनी आवाज उठवला होता. अखेर रस्त्यामधील अडथळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन हटवले आहेत त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com