नारायण तलाव परिसर बनला मद्यपींचा अड्डा

नारायण तलाव परिसर बनला मद्यपींचा अड्डा

२६ (टुडे पान २ साठी, मेन)


-rat१४p१२.jpg-
P२४M८३५४५
चिपळूण : शहरातील नारायण तलाव परिसरात पडलेल्या दारूच्या बाटल्या.
-------------

नारायण तलाव परिसर बनला मद्यपींचा अड्डा

प्रशासनाचे दुर्लक्ष ; रात्री पोलिसांची गस्त आवश्यक, नागरिकांकडून कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ : शहरातील नारायण तलावाच्या चौफेर बागेला दारुड्यांनी आपला अड्डा बनवला आहे. या ठिकाणी अंधार पडताच रात्री उशिरापर्यंत पार्टी आयोजित केली जाते. इतकेच नाही, तर दारू पिल्यानंतर बाटल्यांचा खच परिसरात विखुरलेल्या अवस्थेत दिसतात. दरम्यान, असे असतानाही कारवाई करण्याबाबत पोलीस किंवा पालिका प्रशासन उदासीन आहे. त्यामुळे तलावाच्या काठावर मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दारुड्यांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
मार्कंडीमध्ये रॉयल नगर परिसरात नारायण तलाव आहे. या तलावाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. तलावात बारमाही पाणी असते. येथे मगरींचाही वावर असतो. पालिकेने नागरिकांना चालण्यासाठी व बसण्यासाठी उद्यान तयार केले आहे; मात्र सदर ठिकाणी मद्यपी बाहेरून दारू आणि इतर खाद्यपदार्थ आणून तलावाच्या बागेत दारू पिण्यात गुंग होतात. दारूच्या सामुग्रीसह दारू पिणाऱ्यांची पार्टी होते. दारू पिण्यास बंदी असतानाही अनेकजण येथे रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करतात. दारूच्या बाटल्याही तलावात फेकतात. त्यामुळे तलावाच्या काठावर चौफेर दारूच्या बाटल्यांचा खच निर्माण झालेला आहे. काहीजण चक्क दररोजच्या बाटल्या फोडून तलावात टाकतात. तलावात कमळाची फुले येतात. ती काढण्यासाठी नागरिक तलावात उतरल्यानंतर या फुटलेल्या बाटल्यांच्या काचांचा खच नागरिकांच्या पायात शिरत असल्याचे येथील परिसरातील नागरिकांनी सांगितले. पालिकेचे सफाई कामगार तलावाच्या स्वच्छतेसाठी जरी तलावात उतरले तर त्यांनाही या फुटलेल्या काचांचा त्रास होतो.
-----------
कोट
नारायण तलावाच्या परिसरात पोलिसांची गस्त गरजेची आहे. जी व्यक्ती व्यसन करताना आढळून येईल, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. तलाव परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. उघड्यावर मद्य प्राशन करणे कायद्याने गुन्हा आहे, पण हा गुन्हा सर्रास मद्यपीकडून होत आहे. तलाव परिसरात लोक सकाळी चालण्यासाठी येतात. त्यांनाही फुटलेल्या बाटल्यांचा त्रास होतो.
--संजय चव्हाण, नागरिक, वीरेश्वर कॉलनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com