महामार्गांवरील धोकादायक 
होर्डिंग्ज तातडीने हटवा

महामार्गांवरील धोकादायक होर्डिंग्ज तातडीने हटवा

महामार्गांवरील धोकादायक
होर्डिंग्ज तातडीने हटवा

प्रसाद गावडे ः जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १४ ः जिल्ह्यात महामार्गांवरील प्रवाशांना घातक ठरतील, असे होर्डिंग्ज तातडीने हटवा, अशी मागणी स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यांना तसे निवेदनही दिले.
निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यातील सर्वच महामार्गांवर ठिकठिकाणी मोठ्या आकाराचे अनधिकृत होर्डिंग्ज उभारले आहेत. ते पावसाळ्यात महामार्गावरील प्रवाशांसह रहदारीच्या नागरिकांना घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई-घाटकोपर येथे सोमवारी (ता. १३) एका पेट्रोल पंपाशेजारीच उभारलेले लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण दुर्घटना घडली. त्यात १४ नागरिकांचा मृत्यू झाला, तर ३५ जखमी झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमधून समोर आल्या आहेत. याशिवाय होर्डिंगखाली पेट्रोल पंपावर असणारी तब्बल ८० वाहने अडकल्याची माहिती देखील समोर आली आहे. व्यावसायिक मार्केटिंगच्या स्पर्धेत अशा प्रकारे झालेली जीवित व वित्त हानी पाहता जिल्हा प्रशासनाने अशा धोकादायक व घातक ठरू शकणाऱ्या होर्डिंग हटविण्याची कारवाई करणे काळाची गरज बनली आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने राष्ट्रीय, तसेच राज्य व जिल्हा ग्रामीण मार्गांवर मोठ्या प्रमाणात लावलेले होर्डिंग्ज सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका व ग्रामपंचायतींना पावसाळ्यापूर्वी हटविण्यासंबंधी कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com