हापूस आंब्याचा हंगाम यंदा जूनपर्यंत लांबणार

हापूस आंब्याचा हंगाम यंदा जूनपर्यंत लांबणार

swt149.jpg
83557
कुडाळ ः येथील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झालेले आंबे.

हापूस आंब्याचा हंगाम
यंदा जूनपर्यंत लांबणार
मोहर उशिरानेः वातावरणाचाही परिणाम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ः सर्वसाधारणपणे दरवर्षी मेच्या अखेरीस हापूस आंब्याचा हंगाम संपुष्टात येतो; मात्र यंदा उशिराने मोहर आलेला असल्याने कोकणातील हापूस आंबा तयार होण्यासाठी मेअखेर उजाडणार आहे. त्यामुळे यंदा हापूस आंब्याचा हंगाम जूनचा पहिला आठवडा किंवा १० जूनपर्यंत राहील, असा अंदाज बागायतदारांनी वर्तविला आहे.
मे अखेरीस बाजारात येणारा हापूस आंबा हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील असेल. सद्यस्थितीत या दोन्ही जिल्ह्यांतून वाशी बाजार समितीत येणाऱ्या हापूसची आवक खूप कमी झाली आहे. सध्या डझनसाठी ४०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहेत. सध्या आंब्याला दर देखील चांगला मिळत आहे. चार डझनच्या मोठ्या हापूस आंब्याच्या एका पेटीला दोन ते अडीच हजार रुपये भाव आहे. आकाराने काहीशा छोट्या हापूसच्या चार डझनच्या पेटीला एक ते दीड डझन रुपये भाव मिळत असल्याचे बागायतदारांनी सांगितले. दरम्यान, यंदा हापूस हंगाम चांगला असून, शेवटच्या टप्प्यात नाही. अजून महिनाभर हा हंगाम असेल. दरही कमी झाले आहेत. अवकाळी पाऊस आणि मार्च शेवटपर्यंत असलेली थंडी यामुळे फळधारणा पुन्हा झाली. त्यामुळे आंबा हंगाम पुढे गेला, असे आंबा बागायतदार विलास ठाकूर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com