मानेज् इंटरनॅशनल स्कूलमध्ये

मानेज् इंटरनॅशनल स्कूलमध्ये

२७ (टुडे २ साठी)


rat१४p१९.jpg-
२४M८३५६६
शोभन यादव, योगिनी चौगुले
---------

मानेज् इंटरनॅशनल स्कूलमध्ये
दहावीत शोभन, बारावीत योगिनी प्रथम

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : कुवारबाव येथील मानेज् इंटरनॅशनल स्कूल या सी.बीएस.ई. बोर्डाच्या शाळेचा इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी (विज्ञान शाखेचा) निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर झाला. दहावीमध्ये प्रथम क्रमांक शोभन सचिन यादव (९८.२ टक्के), आणि बारावी विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक योगिनी आनंदा चौगले (९३.४ टक्के) हिने पटकावला.
दहावीमध्ये द्वितीय क्रमांक अथर्व दिनेश कदम (९७ टक्के), तृतीय श्रवण योगेश मोहिते (९१.४ टक्के) यांनी यश मिळवले. इयत्ता दहावीत इंग्रजी शोभन यादव (९८), हिंदी श्रवण मोहिते (९९), गणित शोभन यादव (१००), अथर्व कदम (१००), विज्ञान अथर्व कदम (९८), समाजशास्त्र शोभन यादव (९९) यांनी विषयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. दहावीचा निकाल १०० टक्के लागला.
बारावी विज्ञान शाखेत द्वितीय क्रमांक अनिश खानविलकर (९१.२ टक्के), तृतीय संजना चिंता (८९.८ टक्के) यांनी मिळवला. बारावीमधून विषय निहाय प्रथम आलेले विद्यार्थी असे- इंग्रजी - संजना चिंता (९६), भौतिकशास्त्र- संजना चिंता (९५), रसायनशास्त्र - योगिनी चौगले (९५), जीवशास्त्र योगिनी चौगले (९६), गणित सक्षम प्रकाश (८८), इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस अनिश खानविलकर (९५). बारावीचा निकाल निकाल ९७.२९ टक्के लागला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन अरोरा, व्यवस्थापक प्रद्युम्न माने, कार्याध्यक्षा नेहा माने, शाळेचे संस्थापक आणि माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com