राजापुरातील नऊ वाड्यांना टॅंकरने पाणी

राजापुरातील नऊ वाड्यांना टॅंकरने पाणी

rat14p17.jpg
83562
राजापूरः येथे विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे.
--------------

राजापुरातील नऊ वाड्यांना टॅंकरने पाणी
नैसर्गिक जलस्त्रोत आटल्याने टंचाईत होणार वाढ
राजापूर, ता. १४ः जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये टँकर धावत असताना राजापूर तालुका टँकरमुक्त होता. मात्र आता या तालुक्यातही टॅंकर धावू लागला आहे. आठ गावांमधील नऊ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली. दोन वर्ष टँकरमुक्त राहिल्यानंतर तिसऱ्या वर्षी राजापूर तालुक्यामध्ये टँकर धावू लागला आहे.
सध्या एका खासगी टँकरद्वारे एक दिवसाआड टँचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यामध्ये काल (ता.१४) वळवाचा जोरदार पाऊस पडूनही उष्म्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचवेळी नैसर्गिक जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे दोन दिवसांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राजापूर तालुक्यातून टँकरची मागणी होवूनही प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नव्हता. मात्र पाण्याची भीषणता वाढत चालल्याने अखेर तालुक्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

चौकट
टँकर सुरु झालेली गावे अन् वाड्या
ओणी - पाचल फाटा, ओझर - धनगरवाडी, वडवली - बौद्धवाडी, शिवाजीनगर, वडदहसोळ - हळदीची खांदवाडी, दोनिवडे - धनगरवाडी, कोंड्येतर्फ सौंदळ - बौद्धवाडी, तळगाव - तांबटवाडी, देवाचेगोठणे - पाटवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com