डंपर चालक संघटनेतर्फे 
जाधव कुटुंबीयांना मदत

डंपर चालक संघटनेतर्फे जाधव कुटुंबीयांना मदत

83647
सरंबळ ः जाधव कुटुंबीयांकडे मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत देताना डंपर चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी. (छायाचित्र ः अजय सावंत)

डंपर चालक संघटनेतर्फे
जाधव कुटुंबीयांना मदत

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः कुडाळ तालुका डंपर मालक-चालक संघटनेतर्फे सरंबळ येथील संदीप जाधव यांच्या १४ महिन्यांच्या मुलावरील शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली.
तालुक्यातील सरंबळ येथील संदीप जाधव यांचा मुलगा स्नेह याच्यावर मुंबई येथे हृदयशस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ८ लाख रुपये खर्च येणार आहे. यासाठी जाधव यांनी मदतीचे आवाहन केले होते. त्या आवाहनानंतर नितीन शिरसाट यांनी आपल्या डंपर संघटनेला मदतीचे आवाहन केले होते. डंपर व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने मदत जमा करून ती कदम यांच्याकडे सुपूर्द केली. काही डंपर व्यावसायिकांनी थेट कदम यांच्याशी संपर्क करून सुमारे ५० हजार रुपये त्यांच्याकडे जमा केले. या वेळी कुडाळ तालुका डंपर मालक-चालक संघटना अध्यक्ष नितीन शिरसाट, सचिव प्रशांत ऊर्फ सडवेलकर, राजन वाळके, स्वरूप सावंत, प्रशांत सावंत, योगेश नाईक, दीपेश कदम आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com