वाशिष्ठी नदीत आपत्तीचे प्रशिक्षण

वाशिष्ठी नदीत आपत्तीचे प्रशिक्षण

३६ (पान ४ साठीमेन)


-ratchl१४३.jpg-
24M83657
चिपळूण ः वाशिष्ठी नदीत आपत्ती विषयक देण्यात येणारे प्रशिक्षण.
---------------

वाशिष्ठी नदीत आपत्तीचे प्रशिक्षण

चिपळूण पालिकेची सज्जता ; जलतरणपटू, कर्मचाऱ्यांचाही सहभाग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः पावसाळ्यात २२ जुलै २०२१ सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास अथवा अन्य आपत्ती ओढावल्यास त्याला कसे तोंड द्यावे, याबाबत येथील पालिका प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या आपत्तीविरोधात लढण्यासाठी मदत कार्यासाठी धावणाऱ्या व्यक्तींना मंगळवारपासून दोन दिवस प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये हौशी जलतरणपटू व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.
चिपळूण शहर व परिसरात २२ जुलैच्या महापुराने चिपळूण शहरात एकच हाहाकार उडाला होता. बचाव कार्य वेळेत न झाल्याने मोठी मनुष्य व वित्तहानी झाली होती. त्यानंतर येथील प्रशासनासह पालिकेचे व्यवस्थापन नागरिकांच्या टीकेचे धनी झाले होते. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला कशा प्रकारे सामोरे जावे, वेळीच मदत कार्य कसे पोहोचविता येईल व होणारे नुकसान कसे टाळता येईल यासाठी चिपळूण पालिका आतापासूनच अलर्ट झाली आहे. पालिका प्रशासनाने पावसाळी पूरपरिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे येथील अस्तित्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती केली आहे.
वाशिष्ठी नदीतील गांधारेश्‍वर मंदिरालगतच्या डोहात हे प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. शिबिरात आपत्कालीन बचाव कार्यासंदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी ९ वाजल्यापासून या निवड चाचणीला सुरवात झाली. यावेळी शहरातील मुरादपूर, शंकरवाडी, पाग व बाजारपेठ परिसरातील तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे शहरातील काही तरुण सहभागी झाले आहेत. याशिवाय नगरपालिकेच्या बहुतांशी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी वाशिष्ठी नदीपात्राच्या मध्यवर्ती भागात जाऊन परत काठावर येणाऱ्या तरुणांची या प्रशिक्षणासाठी निवड केली. पुणे येथील अस्तित्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भूषण देशपांडे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. या वेळी मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, अनंत मोरे, प्रसाद साडविलकर, वैभव निवाते आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com