इंधन दरवाढीने मशागतीचा खर्च वाढला

इंधन दरवाढीने मशागतीचा खर्च वाढला

४४ (पान ५ साठी)

मशागतीचा खर्च वाढला

शेतकरी चिंतेत ; इंधन दरवाढीचा फटका

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १४ ः शेतीमध्ये उत्पन्नाच्या तुलनेमध्ये वाढत्या खर्चाचा ताळमेळ बसविताना शेतकरी राजा मेटाकुटीस आलेला आहे. त्यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये झालेल्या वाढीने मशागतीच्या खर्चाच्या झालेल्या वाढीची भर पडली आहे. त्यातून खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्‍याच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. अशा स्थितीमध्ये खतांच्या दरामध्ये वाढ न होता स्थिरता राहिल्याने शेतकऱ्‍यांना दिलासा मिळाला आहे.
गतवर्षी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये झालेल्या वाढीने मशागतीच्या खर्चामध्ये वाढ झाली आहे. त्याच्याजोडीने खतांच्या दरामध्ये झालेल्या वाढीने शेतकऱ्‍यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले होते. गतवर्षी शेतीसंबंधित विविधांगी वाढलेल्या दरांमुळे उत्पन्न आणि खर्चाचे बजेट कोलमडलेले असल्याने यावर्षी काय स्थिती राहणार याकडे शेतकऱ्‍यांचे लक्ष लागून राहीले आहे. अशा स्थितीमध्ये पेट्रोल-डिझेलच्या खर्चामध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही. त्यामुळे मशागतीच्या खर्चामध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी फारसा बदल जाणवणार नाही.
-------
चौकट ः
सध्याचे खतांचे दर
युरीया ः २६७ रुपये
सुफला ः १४७० रुपये
१०ः२६ः२६ ः १४७० रुपये
सम्राट ः १३५० रुपये
एसएसपी ः ५७७ रुपये

.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com