क्राईम

क्राईम

P२४M८३५११
चिपळूणः भराडे येथे मोटारीवर धडकलेली दुचाकी.
--------
दुचाकी-मोटारीच्या
धडकेत दोघे जखमी
चिपळूण : चिपळूण-कराड मार्गावरील भराडे येथे मोटार व मोटारसायकलची जोरदार धडक होऊन दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी आहेत. हा अपघात आज दुपारी १२ च्या सुमारास घडला.अलोरे हायस्कूलमधील शिक्षक सुनील विठ्ठल लांजेकर हे ताब्यातील मोटार घेऊन भराडे येथे एका कार्यक्रमसाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यावर ते शिरगाव येथे घरी जाण्याच्या दिशेने आपली मोटार रस्त्यावर बाहेर काढत असताना कोळकेवाडीहून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलने मोटारीला समोरील बाजूस जोरदार धडक दिली. त्यामुळे मोटारसायकलवरील युवक संघरक्षित सचिन मोहिते (वय २६) व प्रतीक तांबे (रा. कोळकेवाडी बौद्धवाडी) हे गंभीर जखमी झाले.
----------------
- rat१४p२.jpg-
२४M८३५१२
महेंद्र बारगुडे
-----------
मोटारीच्या धडकेत
दुचाकीस्वार ठार
संगमेश्वरः देवरूख-रत्नागिरी मार्गावरील आंबव-सुतारवाडी बसथांब्याजवळ सोमवारी दुपारी मोटारीने दुचाकीला दिलेल्या धडकेत संगमेश्वर तालुक्यातील किरडुवे बारगुडेवाडीतील महेंद्र महादेव बारगुडे (वय ४२) याचा मृत्यू झाला. महेंद्र बारगुडे हा दुचाकीने देवरूखहून किरडुवे गावी जात होते. त्यांच्या पाठीमागे प्रवीण बारगुडे बसले होते. त्यांची दुचाकी आंबव सुतारवाडी बसथांब्याजवळ आली असता रत्नागिरीहून देवरूखच्या दिशेने येणाऱ्या मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात महेंद्र बारगुडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना देवरूख येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्याच्या पाठीमागे बसलेले प्रवीण बारगुडे हे जखमी झाले आहेत. त्यांना रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com