परशुराम रुग्णालयात महिलेचा मृत्यू

परशुराम रुग्णालयात महिलेचा मृत्यू

पा न३


परशुराम रुग्णालयात महिलेचा मृत्यू
खेड ः तालुक्यातील घाणेखुंट येथील परशुराम रुग्णालयात एका महिलेला औषधोपचासाठी दाखल केले असता तिचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना १२ मे रोजी रात्री ११.१५ वाजता घडली. वैशाली विजय रहाटे (वय ५२, सध्या रा. पिरलोटे, साईनगर, खेड) असे या आकस्मिक मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या मुलांनी याची पोलिसांत खबर दिली. वैशाली विजय रहाटे यांना डाव्या बाजूला दोन वर्षापूर्वी अर्धांग झाला होता. १२ मे रोजी रात्री १०.३० च्या सुमारास त्या छातीत दुखत असल्याचे ओरडत होत्या. काही वेळाने त्यांना जास्त त्रास जाणवू लागल्याने त्या बसल्याजागी बेशुद्ध पडल्या. म्हणून त्यांच्या मुलांनी रिक्षाने परशुराम रुग्णालयात रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

भरणेत आढळला मानवी सांगाडा
खेड ः शहराजवळील भरणे गवळवाडी जंगलमय भागातील पडक्या शेतघरामध्ये मानवीसदृश्य हाडे असलेला सांगाडा सापडला आहे. १३ मे रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास हा सांगडा दिसला. पोलिसांनी बेवारस म्हणून हा सांगाडा दाखल केला आहे. हा सांगाडा नेमका कोणाचा याचा शोध खेड पोलिस घेत आहेत.

खेडमध्ये जलवाहिनी फुटून पाणी वाया
खेड ः शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रात्रीच्या सुमारास जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय झाला. सर्वत्र पसरलेल्या पाण्यामुळे दलदल निर्माण होऊन वाहने हाकताना चालकांना तारेवरची कसरतच करावी लागली. याठिकाणी जलवाहिनी फुटून पाणी वाहून जात असताना पालिकेचे पाणी विभागातील कर्मचारी फिरकलेच नसल्याचे नजीकच्या रहिवाशांचे म्हणणे आहे. येथील बसस्थानकासमोरही सोमवारी सकाळी जलवाहिनी फुटली होती. पालिकेच्या हद्दीतील बहुतांश जलवाहिन्या जुनाट असून देखभालीअभावी त्या फुटत आहेत. या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी सातत्याने करण्यात येणाऱ्या खोदाईमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना फटका बसत आहे.

मोटारीच्या धडकेत पाच जण जखमी
खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ कंटेनरला बाजू काढून पुढे जाण्याच्या नादात एका मोटारीने समोरून येणाऱ्या मोटारीला धडक दिल्याने पाच जण जखमी झाले. याप्रकरणी मोटार चालक अकिल इस्माईल फणकर (वय ४७, पाली, रायगड) याच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. योगेश रामदास पाटील मोटार (एमएच ४३ बीई ८८८९) घेऊन नवी मुंबई येथून चिपळूण येथे जात होते. याचवेळी अकील फणकर मोटार (एमएच ०६ सीपी २७२१) मधून पाच प्रवाशांना घेऊन गोवा येथून मुंबईच्या दिशेने जात होते. गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या कंटेनरला बाजू काढून पुढे जाण्याच्या नादात समोरून येणाऱ्या दुसऱ्या मोटारीवर पाच जण जखमी झाले. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com