बेशिस्त वाहनचालकांवर 
फोंडाघाट येथे कारवाई

बेशिस्त वाहनचालकांवर फोंडाघाट येथे कारवाई

83705
फोंडाघाट : येथील बाजारपेठेत आज वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.


बेशिस्त वाहनचालकांवर
फोंडाघाट येथे कारवाई

वाहतुकीमध्ये अडथळा आणण्यांना चाप


सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १४ : सतत वाहतूक कोंडीचा अडथळा ठरणाऱ्या फोंडाघाटमध्ये वाहतूक पोलिसांनी आज अचानक कारवाईची मोहीम सुरू केली. यात वाहतुकीला अडथळा ठरलेल्‍या वाहनचालकांकडून दंड आकारण्यात आला. या कारवाईनंतर फोंडाघाटात वाहतुकीला शिस्त लागली असून स्थानिकांची वाहतूक कोंडीतूनही सुटका झाली.
जिल्ह्यातील इतर बाजारपेठांपेक्षा फोंडाघाटची बाजारपेठ रूंद आहे. मात्र दोन्ही बाजूंनी उभी केली जाणारी वाहने. अस्ताव्यस्त पार्किंग यामुळे बाजारपेठेत सतत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्‍यामुळे आज वाहतूक पोलिसांनी अचानकपणे फोंडाघाट बाजारपेठेत विना परवाना, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. ही कारवाई सुरू होताच बाजारपेठेतील अनेक वाहने गायब झाली. तसेच अनेक दुचाकीस्वारांनी फोंडाघाट बाजारपेठेत न येता अन्य मार्गाद्वारे जाणे-येणे सुरू ठेवले. यामुळे आज दिवसभरात फोंडाघाटवासीयांसह वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला नाही. त्‍यामुळे वाहतूक पोलिसांकडून अशीच कारवाई सातत्‍याने व्हावी, अशी मागणी नागरिक, पादचारी, वाहन चालक आणि पर्यटकांतून व्यक्‍त झाली. या मोहिमेमध्ये पोलिस उपनिरीक्षक श्री. शेगडे, हेड कॉन्स्टेबल चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल घाडीगावकर, प्रकाश गवस, संदेश आबिटकर, जाधव आदी सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com