सुक्या मासळीच्या दराने हजारी गाठली

सुक्या मासळीच्या दराने हजारी गाठली

१८ (टूडे पान ३ साठी, मेन)

- rat१५p१.jpg- ओळी ः
P२४M८३७४४
साळवी स्टॉप येथे पॅकिंग केलेली स्वच्छ सुकी मासळी विक्रीला (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
- rat१५p५.jpg-
P२४M८३७६६
ओळी ः साळवी स्टॉप येथे सुकी मासळीच्या विक्री करताना वसीम दाऊद.
-----

सुक्या मासळीला खवय्यांची पसंती

सुके सोड्यांचा दर साडेतीन हजार रूपये; दर्जाला महत्व ; कोलंबी, बोंबिल, चेवनाच्या खरेदीकडे कल

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः कोकणात सुक्या व ओल्या मासळीला शहरी व ग्रामीण भागात प्रचंड मागणी असते. सध्या मासेच कमी मिळत असल्याने सुक्या मासळीचे दर वधारलेले आहेत. यामध्ये सर्वाधिक पसंतीस उतरणाऱ्या सुके सोड्यांचे दर किलोला दर्जानुसार अडीच हजारापासून साडेतीन हजारावर पोचले आहेत. जिल्ह्यातील बुरोंडी, हर्णै येथून येणाऱ्या सुक्या मासळीबरोबरच अलिबाग, गुजरातमधील कोलीमही रत्नागिरीतील बाजारात विक्रीसाठी आहे. कोलंबी, बोंबिल, चेवना आणि खारा माशांना जिल्ह्यासह चाकरमान्यांकडून मागणी वाढली आहे.
एप्रिल, मे महिना संपत आल्यानंतर पावसाळ्यात मासाहारी खवय्यांची अडचण होते. त्यासाठी पुर्वापार चालत आलेल्या आगोटच्या खरेदीकडे लोकांचा कल असतो. ग्रामीण भागातील जनता आठवडा बाजारात सुकी मासळी खरेदी करताना दिसत आहे. व्यवसायिकांनीही खरेदी करणाऱ्याचा कल पाहून आकर्षक पॅकिंगचा फंडा अवलंबला आहे. चांगल्या प्रतीची सुकी मासळी पॅकिंग करुन विकली जाते. त्यात सुके बोंबील, चेवना, बारीक कोलीम, ढोमी, मांदेली, सुरमय, शिंगटा, मुशी, वागळी आदींचा समावेश आहे. सुक्या मासळीच्या दुकानात मासळी घेतली तर ती कमी अधिक दरात पॅकिंगमध्ये सापडते. जसे सोडा व कोलीम यामध्ये व्यावसायिकांकडून दर्जा राखला आहे. अगदी सोडे घ्यायचे झाल्यास त्याची किंमत दर्जानुसार कमी-अधिक आहे.
हर्णे, बुरोंडी येथून येणाऱ्या सुकी मासळीवर प्रक्रिया करुन ती त्या-त्या दर्जानुसार विकतात. गावठी बोंबिल, चवेना, खारा मासा, ढोमी आणि कोलीम ग्रामीण भागात अधिक मागणी आहे. कोलिममध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. बर्फातून काढलेला कोलिम आणि जाळ्यातून काढून सुकविलेला असे प्रकार आहेत. जाळ्यातून काढलेल्या जवल्याला जास्त मागणी आहे. ग्राहकांना चांगल्या प्रतिचे सुके मासे मिळावे यासाठी रत्नागिरीतील वासीम दाऊद यांनी विविध प्रकारचे सुके मासे पॅक करून ठेवले आहेत.
दरम्यान, यंदाचा मासेमारी हंगाम ३१ मे पासून संपेल. १ जूनपासून पुढील २ महिने पावसाळ्यात मासेमारी बंद राहील. त्यामुळे बंदीच्या काळात मांसाहार खाणाऱ्यांना सुक्या मासळीचा पर्याय असतो. चालू हंगामात विविध कारणामुळे सुक्या मासळीचे दर वधारलेले आहेत. मात्र आगोटच्या तयारीसाठी गावा-गावातून आठवडा बाजार तसेच सुक्या मच्छी दुकानातून सुकी मच्छी खरेदी करुन बेगमी केली जात आहे.

-----------
चौकट

पॅकिंग केलेल्या सुकी मासळी दर

सुक्या मासळीचे प्रतिकिलो दर सुके सोडे दर्जानुसार २५०० ते साडेतीन हजार प्रतिकिलो दर. सुके बोंबिल ७०० रुपये प्रती किलो, खारा बांगडा २० रुपयांना फक्त एक नग, सुका कोलीम ३०० रुपये ते ४०० रुपये किलो. चेवन ४०० रुपये किलो, सुकी ढोमी ५०० किलो. सुकी मांदेली ४०० रुपये किलो. सुका सौंदाळा ६०० रूपये किलो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com