तेंडोली अनलादेवी मंदिरचा
आजपासून वर्धापन दिन

तेंडोली अनलादेवी मंदिरचा आजपासून वर्धापन दिन

83774
श्री देवी अनलादेवी

तेंडोली अनलादेवी मंदिरचा
आजपासून वर्धापन दिन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ ः तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवी मंदिराचा १४ वा वर्धापन दिन सोहळा १६ ते १८ मे या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या (ता. १६) सकाळी ८ वाजता लघुरुद्राभिषेक, महापूजा, दुपारी १ वाजता नैवेद्य, आरती, प्रसाद, सायंकाळी ६ वाजता कीर्तनकार भाऊ नाईक (वेतोरे) यांचे कीर्तन, रात्री ८.३० वाजता मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक, १७ ला सकाळी ८ वाजता श्री देवी अथर्वशीर्ष जप, दुपारी १ वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी ५.३० वाजता कीर्तनकार महेश काणे (चिपळूण) यांचे ‘भद्रकाली’ कीर्तन, रात्री ८ वाजता जिल्हास्तरीय लावणीनृत्य स्पर्धा, १८ ला सकाळी ८ वाजता श्रीचरणी सार्वजनिक लघुरुद्र, अभिषेक, १० वाजता सत्यनारायण महापूजा, आरती, नैवेद्य, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता रामकृष्ण हरी संगीत संस्कार वर्गाचे (तेंडोली) भजन, रात्री ८ वाजता ग्रामस्थांची भजने, ९ वाजता पालखी सोहळा, १० वाजता वालावलकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनलादेवी सेवा मंडळ (तेंडोली) यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com