साळसकरांच्या कुटुंबाला भाजपची मदत

साळसकरांच्या कुटुंबाला भाजपची मदत

83776
पांग्रड ः लवू साळसकर यांच्या नातेवाइकांना भाजपतर्फे एक लाखांची मदत सुपूर्द करण्यात आली. या वेळी उपस्थित पदाधिकारी.

साळसकरांच्या कुटुंबाला भाजपची मदत

मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू; पालकमंत्र्यांकडून तत्काळ दखल

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १५ ः पांग्रड येथील मधमाशी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लवू साळसकर यांच्या कुटुंबाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपतर्फे एक लाखांची आर्थिक मदत केली.
दोन दिवसांपूर्वी पांग्रड, नागमाचे टेम्ब येथे धार्मिक कार्यक्रमादरम्यान मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात लवू नारायण साळसकर यांचा मृत्यू झाला होता. तसेच ४० ग्रामस्थ जखमी झाले होते. पालकमंत्री चव्हाण यांनी या घटनेची तत्काळ दखल घेत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाइकांची आणि जखमींची विचारपूस करून त्यांना आर्थिक मदत करण्याबाबत सूचना केली होती. त्यानुसार आज जिल्हाध्यक्ष सावंत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संध्या तेरसे, तालुकाध्यक्ष दादा साईल, माजी सभापती किशोर मर्गज, निरुखे सरपंच कीर्तीकुमार तेरसे, अमोल मर्गज यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पांग्रड, नागमाचे टेम्ब येथील मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लवू साळसकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन भाजपतर्फे एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली.
या वेळी या वाडीतील या हल्ल्यात जखमी झालेल्या अन्य नागरिकांचीही विचारपूस करून त्यांना प्रशासनातर्फे लागणारे सहकार्य करण्याची हमी दिली. मृत साळसकर यांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा’अंतर्गत मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या. या वेळी मृत साळसकर यांची पत्नी ललिता लवू साळसकर, मुलगा सागर लवू साळसकर, मुलगी वर्षा लवू साळसकर, विवाहित मुलगी मनाली संतोष चव्हाण, भाऊ मधुकर, नारायण साळसकर, तसेच सुनील मर्गज, अमोल पांग्रडकर, भालचंद्र मर्गज, प्रमोद जाधव, गजानन पांग्रडकर, आनंद कुंभार, नारायण माणगावकर, काशिराम राणे, सुशील जाधव, संतोष चव्हाण, श्याम माणगावकर, गणेश राणे आणि अन्य ग्रामस्थ, तसेच वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी पालकमंत्र्यांच्या संवेदनशील वृत्तीसाठी उपस्थित ग्रामस्थांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com