चार वर्षात कुटुंबकल्याणच्या ८५२ शस्त्रक्रिया

चार वर्षात कुटुंबकल्याणच्या ८५२ शस्त्रक्रिया

१७ (टुडे पान २ साठी)

चार वर्षात कुटुंबकल्याणच्या ८५२ शस्त्रक्रिया

राजापुरात जन्मदर समाधानकारक ; ३ हजार ८८४ बालकांचा जन्म

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः तालुक्यात गेल्या चार वर्षामध्ये ३ हजार ८८४ मुले जन्मली असून त्यामध्ये मुलींच्या तुलनेमध्ये मुलांची संख्या जास्त दिसत असली तरी, मुला-मुलींचा जन्मदर समाधानकारक दिसत आहे.

समाजामध्ये स्त्री-पुरूष समानता असल्याचे सांगितले जात असले तरी कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर, एक पाऊल पुढे असल्याचे चित्र आहे.
गेल्या चार वर्षामध्ये ३ हजार ८८४ मुलांचा जन्म झाला आहे. त्यामध्ये मुलांच्या तुलनेमध्ये मुलींची संख्या काहीशी कमी आहे. असे असले तरी मुला-मुलींचा जन्मदर समाधानकारक दिसत आहे. २०२०-०२१ मध्ये १ हजार ११७, २०२१-०२२ मध्ये ९१५, २०२२-०२३ मध्ये ८५५ तर, २०२३-०२४ यावर्षामध्ये ९९७ मुलांचा जन्म झाला आहे. कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांचा विचार करता गेल्या चार वर्षामध्ये ८५२ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामध्ये २०००-०२१ मध्ये ८१, २०२१-०२२ मध्ये ९५ तर, २०२२-०२३ मध्ये ४११ तर, २०२३-२०२४ मध्ये २६५ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या चार वर्षामध्ये कुटुंबकल्याणच्या झालेल्या शस्त्रक्रियांमध्ये केवळ दोन पुरुष कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाली असून तब्बल ८५१ महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
----------------
दृष्टीक्षेपात कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया

वर्ष* शस्त्रक्रिया संख्या
२०२०-२०२१* ८१
२०२१-२०२२* ९५
२०२२-२०२३* ४११
२०२३-२०२४* २६५
----------------

चौकट ः २
जन्मसंख्या ः
वर्ष* जन्मलेल्या मुलांची संख्या
२०२०-२०२१* १११७
२०२१-२०२२* ९१५
२०२२-२०२३* ८५५
२०२३-२०२४* ९९७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com