प्रासंगिक लेख

प्रासंगिक लेख

२३ (टूडे २ साठी, प्रासंगिक लेख, तळात घ्यावा)


– rat१५p९.jpg -
P२४M८३७७०
प्रकाश दीक्षित, राजाभाऊ दीक्षित
------------

तब्बल ७५ वर्षे वृतपत्र वितरण
व्यवसायातील दीक्षित कुटुंबीय

इंट्रो
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चिपळूण येथील वृत्तपत्र वाचकांची संख्या अगदीच मर्यादित होती. त्या काळात १७ वर्षीय राजाभाऊ दिक्षीत घरोघरी फिरून पाच ते दहा वृत्तपत्रे लोकांना देत. (कै.) राजाभाऊंनी ५९ वर्षे विविध प्रकारची वृत्तपत्रे लोकांपर्यत पोहोचवण्याचे काम केले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव प्रकाश दिक्षीत हा व्यवसाय अविरतपणे साभाळत आहेत. सध्या वृत्तपत्र वितरण व्यवसायात नव्याने येणाऱ्यांची संख्या कमी आहे. पण गेली ७५ वर्षे दीक्षित परिवाराने वृतपत्राचे वितरण अवितरणे सुरू ठेवले आहे. १६ मे १९४९ ते १६ मे २०२४ दरम्यान ७५ वर्षे वृत्तपत्र वितरण व्यवसाय करणारा दीक्षित परिवार हा शहरात तसा एकमेव असाच ठरलेला आहे.

-प्रतिनिधी
----------

राजाभाऊ यांचे मूळ नाव दिगंबर भास्कर दीक्षित. पण ते राजाभाऊ नावाने सर्वत्र परिचित होते. ते मूळचे गुहागरचे, पण जन्म दापोली जवळील गिम्हवणे येथे झाला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे फारसे शिक्षण झालेले नाही. त्यावेळी चिपळूण हे भरभराटीला आलेले बंदर होते. दीक्षित यांनी चिपळुणात धाव घेतली. जगण्यासाठी त्यांनी विठ्ठल मंदिराची पूजा स्वीकारली. बाळाजी नारायण चितळे ही प्रख्यात पेढी. नाना आणि अण्णा चितळे हे प्रस्थ होते. इथे साहित्यिक राजकारणी यांची नित्याची बैठक असायची. राजाभाऊ या पेढीवर नोकरीला लागले. नाना चितळे यांचे विविध वृत्तपत्रात लेख यायचे. वृत्तपत्रांशी राजाभाऊंचा संबंध यायला लागला. राजाभाऊ हे संघाचे स्वयंसेवक. पेढीवर असलेल्या बंडोपंत जोशी यांनी राजाभाऊंना वृत्तपत्र वितरणाचे काम दिले आणि १६ मे १९४९ रोजी राजाभाऊंनी वृत्तपत्र विक्रीचा वसा घेतला. दहा पंधरा अंक आणि अंकाची किंमत एक आणा. त्यातून कमिशन मिळणार किती, मात्र राजाभाऊंनी घेतलेला वसा श्रद्धने जपला.
उपजीविकेला हे पुरणारे नसल्यामुळे ते चंद्रोदय छपखान्यात जुळारी (कंपोझिटर) म्हणून काम करू लागले. हळूहळू मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांची त्यांना एजन्सी मिळत गेली. एसटी बसमधून पेपर येत असल्याने त्याला उशीर व्हायचा, परिणामी वाचकांनाही मुंबई वृत्तपत्र दुपारीच वाचायची सवय झाली होती. थंडी, पाऊस, उन, कुठल्याही दिवसात राजाभाऊ सायकलला दोन बाजूला पिशव्या लाऊन रोज दहा बारा मेल फिरायचे. राजाभाऊंकडे आसपासच्या तालुक्यातही वृत्तपत्र वितरणाच्या एजन्सीचे काम आले. इतकेच नाहीतर गोवामुक्ती नंतर गोव्यात महाराष्ट्रातली नवशक्ती, नवाकाळ ही दैनिके सर्वात प्रथम पोचविण्याचे श्रेयही राजाभाऊंचेच. राजाभाऊंचा जनसंपर्क, वर्तमनपत्रांच्या विक्रीचा वाढता खप बघून तत्कालीन संपादक राजाभाऊंना बोलावून घेत. त्यातूनच नवशक्ती, नवाकाळला चिपळूण परिसरातल्या बातम्या झळकू लागल्या. आचार्य अत्रे यांच्या ''मराठा''मध्येही राजाभाऊंनी काम केले. उतरत्या वयातही त्यांनी अवितरणे वृतपत्रे घरोघरी पोहचवण्याचे काम केले. थांबला तो संपला ही त्यांची म्हण होती. ८ जानेवारी २००८ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात प्रकाश दीक्षित वृत्तपत्र वितरण व्यवसाय साभांळत आहेत. सर्व दैनिकांशी चोख व्यवहार हे दीक्षित एजन्सीचे वैशिष्ट्य.

-------
-----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com