सिंचनात वाढ अन् पाणीटंचाईत घट

सिंचनात वाढ अन् पाणीटंचाईत घट

४ (टुडे पान १ साठीमेन)


-rat१५p१२.jpg-
P२४M८३७९७
राजापूर ः पाण्याने भरलेले पांगरे धरण
-rat१५p१३.jpg-
P२४M८३७९८
राजापूर ः शीळ येथील धरणाचे सुरू असलेले काम.
-------------

सिंचनासह टंचाईवर उपाय भाग १ ...........लोगो

इंट्रो
तालुक्यामध्ये डझनभरापेक्षा अधिक छोटे-मोठे धरण प्रकल्पउभारण्यात आले. त्यापैकी बहुतांश प्रकल्प पूर्ण झाले असून काही धरण प्रकल्पांची पूर्णावस्थेकडे वाटचाल सुरू आहे. या धरणांमुळे वाढणाऱ्या सिंचनक्षमतेमुळे भविष्यात तालुक्याच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. त्याचवेळी तालुक्याला दरवर्षी भेडसावणारी पाणीटंचाईही दूर होण्यास कशी मदत होणार आहे यावर प्रकाशझोत टाकणारी मालिका आजपासून..................

--राजेद्र बाईत, राजापूर
--------

सिंचनात वाढ अन् पाणीटंचाईत घट

राजापूर तालुका ; शेतीतून रोजगार निर्मितीही

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ःसिंचन क्षमता वाढविण्याच्यादृष्टीने तालुक्यामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये २१ हून अधिक छोटे-मोठे धरण प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. त्यावर आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा शासन निधीही खर्च करण्यात आला आहे. त्यापैकी अकरा प्रकल्पांचे बांधकाम पूर्ण होवून त्यामध्ये पाणीसाठा झाला आहे. तर दहाहून अधिक धरण प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. धरण प्रकल्पांच्या उभारणीच्या विणलेल्या जाळ्यातून उपलब्ध होणाऱ्‍या पाण्याचा सुयोग्य वापर झाल्यास शेतीतून रोजगार निर्मिती अन् त्या-त्या परिसरातील पाणीटंचाई दूर होताना भविष्यामध्ये राजापूर तालुका सिंचनाने सुजलाम सुफलाम होण्यासह आर्थिक सुबत्ता निर्मिती होण्यास मदत होणार आहे.
विस्तारलेल्या राजापूर तालुक्यातून अर्जुना, कोदवली, जामदा अशा मोठ्या नद्या गेल्या कित्येक वर्षापासून वाहत आहेत. पावसाळ्यामध्ये पूर असलेल्या या नद्या मात्र, उन्हाळ्यात कोरड्या शुष्क झालेल्या असतात. त्याला वर्षानुवर्षे नदीपात्रामध्ये साचलेल्या गाळासह अन्य विविध कारणे कारणीभूत आहेत. मात्र, या नद्यांवर ठिकठिकाणी छोट्या-छोट्या धरणांची उभारणी होवून त्या माध्यमातून पाणी अडविल्यास त्याचा उपयोग शेतीसाठी अन् रोजगारनिर्मितीसाठी निश्‍चितच होणार आहे. भविष्यातील ही हरितक्रांती नजरेसमोर ठेवून तत्कालीन शासन आणि लोकप्रतिनिधींनी तालुक्यामध्ये सतराहून अधिक छोटी-मोठ्या धरणांची उभारणी प्रस्तावित केली आहेत. यापैकी अर्जुना धरण प्रकल्प, चिंचवाडी धरण (पांगरे), ओझर, जुवाठी, कोंड्ये आदी धरणांची कामे पूर्ण होवून त्यामध्ये मोठ्याप्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. अकराहून अधिक धरणांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. अपुऱ्‍या राहिलेल्या धरणांची कामे रखडण्याला विविध कारणे आहेत, ते अडथळे दूर होऊन भविष्यामध्ये धरणांची रखडलेली कामे निश्‍चितच मार्गी लागणार आहेत. ज्या धरणांची कामे मार्गी लागली आहेत त्या धरणांमधील पाणीसाठ्याचा परिसरातील क्षेत्र शेतीच्या माध्यमातून ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. त्याच्यातून, तालुक्याची सिंचनक्षमता वाढणार आहे. त्याचवेळ पस्तीसहून अधिक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही सुटण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. एकंदरीत, या धरणांमधून होणारे सिंचन अन् शेतीतून राजापूर तालुका आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे.
------------
राजापुरातील धरण प्रकल्प
काजिर्डा, अर्जुना मध्यम प्रकल्प, जामदा, चिंचवाडी धरण (पांगरे), चव्हाणवाडी (ताम्हाणे), काकयेवाडी, वाटूळ, कोंडवाडी (कळसवली), वाळवड (मूर), ओझर, तळवडे, झर्ये, पाचल, परूळे, सौंदळ बारेवाडी, कोंड्ये, जुवाठी, कशेळी, गोपाळवाडी, शीळ, चिखलगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com