पदवीधर मतदारांच्या समस्या 
सोडवा ः दयानंद मांगले

पदवीधर मतदारांच्या समस्या सोडवा ः दयानंद मांगले

83831
दयानंद मांगले

पदवीधर मतदारांच्या समस्या
सोडवा ः दयानंद मांगले

वयोमर्यादेनंतर सवलती देण्याचीही मागणी

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १५ ः कोकणातील बेकार पदवीधर अद्यापही उपेक्षितच आहेत. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडल्यानंतर त्यांना मासिक बेकार भत्ता तसेच प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत देण्याची मागणी दयानंद मांगले यांनी केली आहे. पदवीधर मतदारांच्या मतावर निवडून येण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्यांनी बेकार पदवीधर मतदारांच्या मतांचा जोगवा मागताना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी देखील विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कोकणातील बेकार पदवीधर अद्यापही उपेक्षितच असून या बेकार पदवीधर तरुण तरुणींना वयोमर्यादा ओलांडल्यानंतर बेकारभत्ता व एसटी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी नागपूर अधिवेशनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे आपण केली होती. मात्र, अद्यापही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नाही. कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी कोकणातील बेकार पदवीधर तरुण तरूणी पदवीधरांना योग्य तो न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करावेत. कोकणात पदवी प्राप्त करून अथवा पदवीपर्यंत शिक्षण घेऊन हजारो तरूण, तरुणी आजही बेकारीच्या खाईत लोटले गेले आहेत. त्यांना त्यांच्या पदवी शिक्षणाप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या रोजगाराच्या संधी अथवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध झालेल्या नाहीत. प्रसंगी कोकणातील बेकार तरुण-तरुणी आपल्या रोजीरोटीसाठी स्वकर्तृत्वावर एखादा छोटा व्यवसाय अथवा रोजंदारीची कामे प्रसंगी खासगी ठिकाणी छोटी-मोठी कामे, चिरेखाण मजूर, बांधकाम करून उदरनिर्वाह करीत आहेत. या बेकार तरुण - तरुणींना कोणत्याही प्रकारची शासकीय अथवा निमशासकीय सेवेची संधी गेल्या कित्येक वर्षात उपलब्ध झालेली नाही. त्यांनी आपली वयाची ४५ वर्षे पूर्ण करूनही त्यांना या शासकीय अथवा निमशासकीय सेवेचा लाभ मिळाला नाही. पदवी प्राप्त करून सुमारे २५ वर्षे उलटूनही हे सर्वजण अजूनही बेकारीचे जीवन जगत आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे प्रयत्न शासनस्तरावर झालेले नाहीत. बेकारांची वयोमर्यादा उलटून ते अद्यापही समस्याग्रस्त आहेत. वयाची ४५ वर्षे उलटून गेलेल्या पदवीधर तरुण, तरुणींना मासिक पाच हजार रुपये बेकार भत्ता, त्याशिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत द्यावी. यापूर्वी निवडून गेलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदारांनी कोकणातील बेकार पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या नसून तसे प्रयत्नही केलेले नाहीत. प्रसंगी लेखी दिलेल्या निवेदनाला साधे लेखी उत्तर अथवा प्रतिसाद देण्याचे त्यांनी प्रयत्न केले नाहीत.
..............
चौकट
सोयी सुविधांपासून वंचित
आज अमृत महोत्सवी वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना राज्य परिवहन महामंडळ प्रवास भाड्यात १०० टक्के मोफत प्रवास सवलत, ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत अशा प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत. महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली जात आहे. परंतु, बेकारीच्या खाईत लोटलेल्या पदवीधर तरुणांना अजूनही कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही, अशी खंतही दयानंद मांगले यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com