पावसाळ्यात यंत्रणा सतर्क ठेवा

पावसाळ्यात यंत्रणा सतर्क ठेवा

83867
कणकवली : नैसर्गिक आपत्ती नियोजनाच्या बैठकीत दीक्षांत देशपांडे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.


पावसाळ्यात यंत्रणा सतर्क ठेवा

तहसीलदार दीक्षांत देशपांडे : कणकवलीत आपत्ती व्यवस्थापन बैठक

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १५ : कोकणात मुसळधार कोसळणाऱ्या पावसासोबत महापूर, रस्ते, वाहतूक ठप्प होणे, धरणक्षेत्रातील अतिरिक्त पाणी सोडणे किंवा रेल्वे आणि घाटमार्गावर आपत्ती येणे नाकरता येत नसल्याने सर्व विभागांतील अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आपली यंत्रणा सतर्क ठेवावी, अशी सूचना कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केली आहे.
येथील तहसील कार्यालयात देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय मॉन्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठक झाली. यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव, तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता के. के. प्रभू, लघु पाटबंधारेचे उपविभागीय अभियंता मंगेश माणगांवकर, संतोष शिरोडकर, महेश हिरेगोंडर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अतुल शिवणीवार, महावितरणचे उपविभागिय अभियंता विलास बगडे, आगार व्यवस्थापक आ. द. गायकवाड तसेच इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. रस्त्यावर पडू शकणाऱ्या धोकादायक झाडांच्या फांद्या कटिंग कराव्यात. नगरपंचायत हद्दीत असणाऱ्या धोकादायक इमारतींचा तातडीने सर्व्हे करून त्यांना नोटिसा द्याव्यात, अशाही सूचना तहसीलदारांनी दिल्या. पुराचे पाणी आल्यास यंत्रणेला कळविण्यासोबतच उपाययोजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच धरणे, नदीच्या पाण्याच्या पातळीबाबत सतर्कतेच्या सूचना प्रशासनापर्यंत तातडीने पोहोचाव्यात, असेही स्पष्ट करण्यात आले.
----
तहसील कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष
तहसील कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला असून, हा कक्ष १ जूनपासून सुरू असणार आहे. या कक्षाचा ९४२२७४६९०६ असा संपर्क क्रमांक असून, काही समस्या निर्माण झाल्यास येथे तातडीने संपर्क साधावा. तसेच तहसील कार्यालयातील सॅटेलाईट फोन यंत्रणासही सुसज्ज केली आहे. फोंडाघाट व गगनबावडा घाटात दरड कोसळण्यासारख्या घटना घडू शकतात. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने आपत्कालीन यंत्रणा जेसीबीसह सतर्क ठेवावी. तसेच त्यांचे फोन नंबर प्रशासनाकडे द्यावेत, अशा सूचनाही श्री. देशपांडे यांनी दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com