रत्नागिरी सीए शाखेतर्फे विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन

रत्नागिरी सीए शाखेतर्फे विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन

४३ (पान २ साठी)


-rat१५p२१.jpg-
२४M८३८४३
रत्नागिरी : रत्नागिरी सीए शाखेतर्फे आयोजित विद्यार्थ्यांना कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सीए अमृता कुलकर्णी. सोबत सीए प्रसाद आचरेकर, सीए शैलेश हळबे, सीए अभिलाषा मुळ्ये.
----------------
रत्नागिरी सीए शाखेतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : द इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या रत्नागिरी शाखेमार्फत नुकतेच रत्नागिरीतील सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे सीए शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी उपस्थित होत्या. उज्ज्वला क्लासेसच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.

सीएच्या अभ्यासक्रमात अभ्यासाचे नियोजन करण्यास फार महत्व आहे. दिवसाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन याचा मेळ कसा घालावा, याबाबतीत सखोल मार्गदर्शन सीए अमृता कुलकर्णी यांनी या वेळी केले. अभ्यास करताना एकाग्रता, मानसिक स्वास्थ्यसुद्धा आणि परीक्षेच्या कालावधीत फार महत्त्वाचे असते. सीए अभ्यासक्रमातील विविध टप्प्यांवर अभ्यास करताना लागणारे ज्ञान हे वेगवेगळे असते. अशावेळी विविध विषयांचा अभ्यास करताना परीक्षेच्या अनुषंगाने काय काळजी घ्यावी लागते याबद्दल सीए कुलकर्णी यांनी स्वतःच्या अनुभवातून आणि विविध उदाहरणातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सीए कुलकर्णी यांनी समर्पक उत्तरे दिली. उज्ज्वला क्लासेसचे संचालक पुरुषोत्तम पाध्ये यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले. रत्नागिरी सीए ब्रँचच्या अध्यक्षा सीए अभिलाषा मुळ्ये यांनी प्रास्ताविक केले. या वेळी व्यासपीठावर सीए ब्रँच रत्नागिरी उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, व्यवस्थापन समिती सदस्य प्रसाद आचरेकर उपस्थित होते. सीए शरद वझे यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com