गावखडीतील सुरुबनाची धूप

गावखडीतील सुरुबनाची धूप

२६ (पान ५ साठी, अॅंकर)

-rat१५p२४.jpg-
24M83880
गावखडी (ता. रत्नागिरी) ः गावखडी किनाऱ्यावरील सुरू बनाची दयनीय अवस्था झाली असून समुद्राचे आक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे.
------------

गावखडीतील सुरुबनाची धूप

लाटांच्या तडाखा ; समुद्र लोकवस्तीजवळ
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १५ ः रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर सुरु बनाची धूप थांबविण्यासाठी समुद्र धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी करण्यात आली होती. परंतु अद्याप त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पावसाळ्यामध्ये सुरू बनावर समुद्राच्या लाटांचा जोरदार मारा होऊन नष्ट होण्याची शक्यता आहे. याकडे तातडीने लक्ष घालावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून या किनाऱ्यावर काही वर्षांपूर्वी सुरू बनाची लागवड करण्यात आल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा फायदा झाला होता, परंतु त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे समुद्र लाटांच्या जोरदार माऱ्यामुळे या भागातील अनेक झाडे कोलमडून पडले आहेत. काही ठिकाणी स्थानिक रहिवाशांनी झाडे तोडून नेली आहेत. त्यामुळे या भागाचे लाटांच्या तडाख्याने धूप होत आहे. गेल्यावर्षी वादळी पावसाचा मोठा तडाका बसला होता. त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी या भागाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देतो, प्रस्ताव पाठवा असे सांगितले होते. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यासाठी आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. परंतु त्याचे साधे भूमिपूजन अद्याप झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पुन्हा एकदा वादळी पाऊस व समुद्र लाटांच्या तडाख्याने सुरू बन नष्ट होण्याची भीती आहे. सुरु बन नष्ट झाल्यास समुद्र आत घुसून लोकवस्तीला धोका निर्माण होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com