ओरोस परिसरात मळ्याला आग

ओरोस परिसरात मळ्याला आग

83870
ओरोस ः आग आटोक्यात आणताना पोलिस कर्मचारी.


ओरोस परिसरात मळ्याला आग

पोलिस, अग्निशामक बंबामुळे आटोक्यात

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १५ ः ओरोस राजधानी हॉटेलमागील मळ्यात अचानक आग लागल्याने येथील नागरिकांची एकच तारांबळ उडाली. सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तसेच ग्रामस्थ आणि कुडाळ नगरपंचायत अग्निशामक कर्मचाऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
ओरोस येथील राजधानी हॉटेलमागील मळ्यात दुपारी दीडच्या सुमारास अचानक आग लागली होती. मळ्यात सुके गवत मोठ्या प्रमाणात असल्याने आगीचा भडका वाढत होता. मळ्यात आग लागल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच ठाणे अंमलदार हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव हजारे यांच्या नेतृत्वाखाली महिला हेड कॉन्स्टेबल कोमल नागरगोजे, कॉन्स्टेबल योगेश मुंढे, श्रीकांत राठोड, अंकुश काळे यांनी घटनास्थळी धाव घेत आग लागलेल्या परिसरातील नागरिकांना सतर्क केले. मिळेल त्या वस्तूच्या साहाय्याने आग अटोक्यात आणण्यास सुरुवात केली. मात्र, भर पारी कडक उन्हात आग लागल्याने आगीने मोठे क्षेत्र व्यापले होते. यावेळी कुडाळ नगरपंचायतीचा अग्निशामक बंबाला पाचारणा करण्यात आले. मात्र, हा बंब येण्यासाठी बराच कालावधी लागल्याने सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी येथील ग्रामस्थांनीही मदतकार्य केले. सायंकाळी कुडाळ नगरपंचायत अग्निशामक कर्मचाऱ्यांनी सिंधुदुर्गनगरी पोलिसांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक हिरमेठ यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com