सम्यक साहित्य संसदतर्फे 
कणकवलीत पुरस्कार वितरण

सम्यक साहित्य संसदतर्फे कणकवलीत पुरस्कार वितरण

83887
कणकवली : येथील कार्यक्रमात सम्यक साहित्‍य संसद संस्थेच्यावतीने डॉ.अनिल कांबळी यांच्याहस्ते प्राचार्य सिद्धार्थ तांबे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अनिल तांबे, डॉ.राजेंद्र मुंबरकर आदी उपस्थित होते.


सम्यक साहित्य संसदतर्फे
कणकवलीत पुरस्कार वितरण


मोतीराम कटारे, प्राचार्य तांबे यांचा गौरव

कणकवली, ता.१५ : सम्यक साहित्‍य संस्थ या संस्थेच्यावीने आज मान्यवर साहित्‍यिकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात आ.सो.शेवरे स्मृती प्रित्यर्थ चा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत व समीक्षक मोतीराम कटारे आणि उत्तम पवार स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा उत्तम सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने या काव्यसंग्रहाचे लेखक प्राचार्य सिद्धार्थ तांबे यांना देण्यात आला.
यावेळी विचारमंचावर साहित्यिक श्री.प्रसेनजित, ज्येष्ठ कवी डॉ.अनिल कांबळी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रकाश तांबे, अभियंते अनिल तांबे, किशोर देऊ कदम यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी कवयित्री संध्या तांबे यांनी पुरस्कार निवड समितीच्या वतीने मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी प्रसेनजित यांनी फुले-आंबेडकरी तत्त्वज्ञानाच्या आधारे धम्म व्यवस्थेची चिकित्सा केली पाहिजे व भावी काळात नवा बौद्ध समाज आदर्श ठरेल, असे वर्तन असावे असे सांगितले. प्रा. डॉ.राजेंद्र मुंबरकर यांनीही संस्थेच्या साहित्यिक उपक्रमाबाबत गौरवोद्गार काढले.
डॉ.अनिल कांबळी म्हणाले, की आबा शेवरे यांनी आपल्या कवितांमधून सम्यक परिवर्तनाची दिशा अधोरेखित केली. आयुष्याचे पासबुक झिरो बॅलन्स असूनसुद्धा कविता जगत राहिले. तर उत्तम पवार यांच्या सारखा उमदा कवी, कार्यकर्ता समाज वास्तवाचे विदारक चित्रण करत होता.
संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल कदम यांनी प्रास्ताविक केले. मधुकर मातोंडकर यांनी स्वागत आणि परिचय केला. रूपाली कदम यांनी मानपत्राचे वाचन केले. कवयित्री सुचिता गायकवाड -कदम यांनी सूत्रसंचालन केले. संस्था सचिव व ज्येष्ठ निवेदक राजेश कदम यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com