गिरोडे येथून महागड्या
एलईडी टिव्ही चोरीस

गिरोडे येथून महागड्या एलईडी टिव्ही चोरीस

गिरोडे येथून महागड्या
एलईडी टीव्ही चोरीस
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १५ ः गिरोडे येथील गोवा ग्रीन येथे दोन एलईडी टीव्ही चोरीस गेल्याची घटना सोमवारी (ता.१३) रात्री घडली. एकूण २ लाख ८१ हजार ४१२ रुपयांचा ऐवज चोरीस गेली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.
गिरोडे येथील गोवा ग्रीन बंगला सोमवारी रात्री बंद होता. यावेळी आज्ञात चोरट्याने ऑफिस व बंगल्याची खिडकी उघडून आत प्रवेश केला. आतमध्ये असलेला १५ हजार रुपये किमतीचा जुना एअर कंडीशन, १ लाख ३३ हजार २०६ रुपये किमतीचे पॅकिंगसहित असलेले दोन नवीन एलईडी टीव्ही चोरट्याने चोरून नेली. याबाबत लॉरेन्स पॉल डिसोजा (४५, रा. किणी कॉलनी, मुलुर, कोर्लीम, ओल्ड गोवा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक ओतारी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com