वाफोली माऊली पंचायतन
प्रवेशद्वारचे लोकार्पण

वाफोली माऊली पंचायतन प्रवेशद्वारचे लोकार्पण

83901
वाफोली ः येथे प्रवेशद्वाराचे लोकार्पण करताना महेंद्र गवस. सोबत विलास गवस व इतर.


वाफोली माऊली पंचायतन
प्रवेशद्वारचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ ः वाफोली गावाचे आराध्य श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान येथे महेंद्र गवस यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारचे आज लोकार्पण करण्यात आले.
तेरेखोल नदीच्या काठी असलेल्या निसर्गरम्य व विलोभनीय परिसरात श्री देवी माऊली मंदिर, लिंग मंदिर, वेताळ मंदिर तसेच म्हारींगण मंदिरे आहेत. सुसज्ज प्रवेशद्वारामुळे मंदिराच्या सुशोभीकरणात भर पडली आहे. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष विलास गवस, देवस्थान प्रमुख हरी गवस, शिवाजी गवस, उद्घाटक महेंद्र गवस, उमाजी गवस, मारुती गवस, सरपंच उमेश शिरोडकर, आना गवस, अंकुश गवस, बबन गवस, मंथन गवस, सतीश गवस, राजन गवस, अनिल आ. गवस, पुरोहित श्रीकांत पेळपकर, महेश गवस, अनिल बा. गवस, भोरू गवस, मंगलदास गवस, अनिल गवस आदी मानकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com