पान एक-मोटार उलटून सातजण जखमी

पान एक-मोटार उलटून
सातजण जखमी

टीपः kan151.jpg मध्ये फोटो आहे.
83879
कणकवली ः मुंबई-गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे मोटार उलटून अपघात झाला.

मोटार उलटून सात जखमी

चालकाला डुलकी लागल्याने हळवल फाट्यावर अपघात

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १५ ः मुंबई-गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे पहाटे पाचच्या सुमारास मोटार उलटल्यामुळे ७ प्रवासी जखमी झाले. डुलकी लागल्‍याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्‍यानंतर मोटार महामार्गावरील दुभाजकाला आदळली. ही मोटार मडगाव ते मुंबई अशी जात होती. अपघातात मोटारीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मडगाव गोवा येथील प्रवासी मोटारीतून मुंबईच्या दिशेने जात होते. हळवल फाटा येथे मोटार आली असता डुलकी लागल्‍याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यात मोटार दुभाजकाला आदळून उलटली. या अपघातामध्ये मोटारीतील बेगम महमंद हनिफ चौकापूर (वय ४०), आयान मुकत्यार गन्नेवाले (वय १४), मौला गुलाबसाब शिगाली (वय २८), बाशिरा मम्मदगौस हकूलदार (वय ७२), अमीर मम्मदगौस हवालदार (वय ३३), आलिया महाबुसाल शिगाली (वय ११), पाईजा जापर कुमुमय (वय ११, (सर्व रा. मडगाव-गोवा) हे जखमी झाले. अपघातानंतर सर्व जखमींना कणकवली उपजिल्‍हा रुग्‍णालयात दाखल करण्यात आले. येथील पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. या अपघाताची फिर्याद चालक अमीर मम्मदगौस हवालदार याने पोलिसांत दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com