बुद्धांच्या शिकवणीत दुःखमुक्तीचे ज्ञान

बुद्धांच्या शिकवणीत दुःखमुक्तीचे ज्ञान

swt165.jpg
83997
कासार्डे : येथील संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर. व्यासपीठावर विजय कदम, दत्तात्रय मारकड, विजय राणे, श्रध्दा शेलार, आर. टी. कदम उपस्थित होते.

बुद्धांच्या शिकवणीत दुःखमुक्तीचे ज्ञान
आनंद कासार्डेकरः कासार्डेत संयुक्त जयंती महोत्सव साजरा
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १६ : शील, समाधी आणि प्रज्ञा या भगवान बुद्धांच्या शिकवणीचे आचरण करा. बौद्ध धर्मातील अनेक तत्वे माणसाला दुःखातून दूर करण्याचे काम करतात. आजही समाज गटातटात विभागला गेला आहे. त्यामुळे समाजाची शक्ती नको तेथे खर्च होते, अशी खंत भारतीय बौद्ध महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी कासार्डे-कदमवाडी येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली.
बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा (रजि.) शाखा कासार्डे-कदमवाडीच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सव व महाबोधी बुद्ध विहार वर्धापन दिन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी विजय कदम, विजय राणे, श्रद्धा शेलार, क्रीडाशिक्षक दत्तात्रय मारकड, अशोक पांचाळ, आर. टी. कदम, स्वप्नील वनकर, शरद शेलार, महेंद्र जाधव उपस्थित होते.
प्रारंभी कासार्डे-कदमवाडी येथे बुध्द विहारात भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक अजय कदम यांनी केले. सत्कारमूर्ती दत्तात्रय मारकड यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन विजय कदम यांनी केले. सकाळच्या सत्रात शाखाध्यक्ष कदम यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण, बुध्द पूजापाठ, दुपारच्या सत्रात महिला व लहान मुलांसाठी फनी गेम्स, सायंकाळी ५ वाजता धम्मरॅली काढण्यात आली. या रॅलीत आबालवृद्धांसह महिलांचा मोठा सहभाग होता. त्यानंतर‌ मालवण कलांकुर‌ ग्रुपचा ‘मराठी अस्मितेच्या पाऊलखुणा’ व वसुंधरा कदम यांचे बहारदार नृत्याचा कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर तांबे, सुहास तांबे, विशाल कदम, योगेश कदम, अजय कदम, चैतन्या तांबे, योगिनी कदम, बबन तांबे, राहुल कदम, सुनील कासले, अमिषा कदम, रुपाली कदम, सुचिता कासले, स्मिता कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. योगेश कदम यांनी आभार मानले.

चौकट
गुणवंत विद्यार्थ्यांसह मान्यवरांचा सन्मान
कासार्डे गावचे सुपुत्र व बौध्द धर्माचे विचारवंत, प्रख्यात प्रवचनकार यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याबद्दल कासार्डेकर यांचा, पत्रकारिता व क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल कासार्डेतील पत्रकार तथा कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांचा सन्मानचिन्ह, भारतीय संविधानाची प्रत, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. रात्रीच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डेच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांत यश संपादन केलेले विद्यार्थी तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com