-''गोडबोले क्लासेस''चे संचालक अमेय गोडबोलेंना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

-''गोडबोले क्लासेस''चे संचालक अमेय गोडबोलेंना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

२६ (टुडे पान २ साठी)


-rat१६p१८.jpg -
२४M८४००३
अमेय गोडबोले
--------

अमेय गोडबोलेंना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

चिपळूण, ता. १६ ः चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात दर्जेदार कामगिरी करणाऱ्या ''गोडबोले क्लासेस''चे मुख्य संचालक अमेय गोडबोले यांना बेळगाव येथील नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
गोवा येथे २६ मे रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, म्हैसूर फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार आणि केंद्रीय मंत्री यांचे अभिनंदन पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. गेली १२ वर्षे गोडबोले क्लासेसने सातत्याने शैक्षणिक दर्जा टिकविला आहे. याच कार्याची दखल घेऊन गोडबोले यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. याच क्लासेसमधून शिकलेली रेवा सावंत हिने दहावीच्या परीक्षेत ९९.२ टक्के गुण मिळवून देदिप्यमान यश मिळवले आहे. गोडबोले यांना यापूर्वी ''सकाळ'' समुहातर्फे ''आयडॉल ऑफ महाराष्ट्र'' आणि ज्ञानभूषण पुरस्कार मिळाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com