मजुरांना पेन्शन, कलावंतांना मानधन

मजुरांना पेन्शन, कलावंतांना मानधन

६ (टुडे १ साठी)


-rat१६p२०.jpg-
P२४M८४००७
रत्नागिरी : मानधनाबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी विकास सूर्यवंशी यांना देताना श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाचे अण्णा लिमये, सुरेंद्र घुडे, रमेश गोवेकर, बाळाजी घोसाळकर.
-----------

पेन्शन, मानधन देण्यात दिरंगाई

जिल्हा परिषदेबाबत मजूर, कलावंतातर्फे निवेदन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : रत्नागिरी जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेल्या ७० मजुरांना सेवानिवृत्ती वेतन दोन-दोन महिने मिळत नाही त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक कलावंतांनासुद्धा मासिक मानधन वेळेवर अदा केले जात नाही. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांचे आजारपण आणि कौटुंबिक समस्यांमुळे आर्थिक कुचंबणा होत आहे. या संदर्भात रत्नागिरी येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टातर्फे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
ज्येष्ठांना दरमहा पाच तारखेपर्यंत निवृत्तीवेतन व मानधन अदा करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने करावी, अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. या वेळी उपजिल्हाधिकारी विकास सूर्यवंशी यांनी निवेदनाचा स्वीकार केला. जिल्हा परिषदेतील संबंधित प्रतिनिधींनी निवेदन स्वीकारले. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाचे मुख्य संयोजक सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये, सचिव सुरेंद्र घुडे, भजनी कलावंत रमेश गोवेकर व बाळाजी घोसाळकर या वेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com