पोलिस अधीक्षकांना शासनाकडून नोटीस

पोलिस अधीक्षकांना शासनाकडून नोटीस

पोलिस अधीक्षकांना
शासनाकडून नोटीस
सावंतवाडीः पोलिसांनी ताब्यात घेतलेली बंदूक गहाळ केल्याप्रकरणी बंदूक मालक रवींद्रनाथ गावकर यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महाराष्ट्र शासन आणि सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे आणि न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठाने ही नोटीस काढली आहे. एका गुन्ह्याच्या तपासकामी सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेली बंदूक त्यांच्याच कस्टडीतून गायब झाल्याप्रकरणी बंदूक मालक गावकर (रा. ओटवणे) यांनी पोलिसांविरुद्ध फिर्याद देऊनही कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे फिर्यादी गावकर यांनी पोलिस अधीक्षकांकडे दाद मागितली. तेथेही दखल न घेतल्यामुळे त्यांनी पोलिस महानिरीक्षकांकडे दाद मागितली. तेथेही दाद न घेतल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात रिट दाखल केला. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासन व सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांना तत्काळ म्हणणे सादर करण्याची नोटीस जारी केली आहे. अर्जदारातर्फे अॅड. महेश राऊळ आणि अॅड. सचिन गावडे काम पाहत आहेत.
..............
अणाव येथे रविवारी
संयुक्त जयंती उत्सव
कुडाळः भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा अणाव-रमाईनगरच्यावतीने रविवारी (ता. १९) अणाव-रमाईनगर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. सकाळी ९.३० वाजता पंचशील ध्वजारोहण, १० वाजता बाळकृष्ण जाधव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ''अर्थशास्त्रतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, देशभक्त डॉ. आंबेडकर, महिला उद्धारक डॉ, आंबेडकर'' या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. दुपारी १२ वाजता डी. के. पडेलकर यांचे मार्गदर्शन, १.३० वाजता पारितोषिक वितरण, सायंकाळी ६ वाजता ईशिका डान्स ग्रुप कणकवलीचा ''साद मराठीची'' कार्यक्रम होणार आहे. इच्छुकांनी नावे अक्षय जाधव यांच्याकडे द्यावीत, असे आवाहन केले आहे.
..............
वेंगुर्ले येथे उद्या
‘स्यमंतक मणी’
वेंगुर्लेः वेंगुर्ले प्राथमिक शाळा नं. २ नजिकच्या गिरपवाडा येथील विसोटेश्वर देवस्थान येथे प्रतिवर्षीप्रमाणे शनिवारी (ता. १८) धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त श्रींची महापूजा, तीर्थप्रसाद व रात्री ९.३० वाजता वेंगुर्ले-परबवाडा येथील श्री सातेरी तरुण दशावतार नाट्यमंडळाचा ‘स्यमंतक मणी’ हा दशातवारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विसोटेश्वर मित्रमंडळातर्फे केला आहे.
...............
जानवलीत रविवारी
डबलबारी सामना
कणकवलीः जानवली-वाकडवाडी येथे रविवारी (ता. १९) रात्री ९ वाजता बुवा योगेश पांचाळ व बुवा अमेय आर्डेकर यांच्यात डबलबारी भजनाचा सामना आयोजित केला आहे. भजनप्रेमींनी या डबलबारी सामन्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जानवली-वाकडवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
...............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com