दापोलीत जागतिक परिचारिका दिन

दापोलीत जागतिक परिचारिका दिन

पा न ५

दापोलीत जागतिक परिचारिका दिन

दाभोळ, ता. १६ : दापोली तालुक्यात महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची दापोली शाखा आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान नर्सेस संघटनेची दापोली शाखेतर्फे जागतिक परिचारिका दिन दापोली येथील श्रीमंगल कार्यालय साजरा करण्यात आला. या वेळी सहायक गटविकास अधिकारी सुनील खरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष मारकड, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल क्षीरसागर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा भागवत, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुतिका भाटकर आदी उपस्थित होते. आरोग्य सहायक अनुजा वालावलकर, स्नेहा पवार, राजश्री बर्वे आणि आरोग्यसेविका स्मिता लघाटे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना शाखा दापोलीच्या अध्यक्षा तपस्वी क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य नर्सेस संघटना दापोली शाखेच्या विभागीय सचिव सिंधू मयेकर, सचिव अर्पिता सावर्डेकर, राष्ट्रीय हेल्थ मिशन नर्सेस संघटना दापोली शाखेच्या अध्यक्षा कीर्ती मोरे, सचिव हर्षिता रसाळ व सर्व नर्सेस भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com