पाण्यासाठी टाकीवर चढून आंदोलन

पाण्यासाठी टाकीवर चढून आंदोलन

swt१६१४.jpg
M84085
सावंतवाडीः येथील पालिकेच्या ४० फुट टाकीवर चढून विलास जाधव यांनी आंदोलन केले.

पाण्यासाठी टाकीवर चढून आंदोलन
सावंतवाडीतील प्रकारः माजी नगसेवक जाधवांकडून आक्रमक भूमिका
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ः येथील माजी नगरसेवक विलास जाधव यांनी आज पाण्यासाठी थेट येथील पालिकेच्या नळपाणी योजनेच्या ४० फूट पाण्याच्या टाकीवर चढून अनोखे आंदोलन केले. जोपर्यंत पाणीपुरवठा नियमित होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी पालिका प्रशासनाला दिला होता. दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी आजपासून १ लाख लिटर पाणी टाकीत सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले.
गेले अनेक दिवस येथील समाज मंदिर परिसरात पालिका प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या पाण्याचा पुरवठा अनियमितपणे सुरू आहे. वारंवार याकडे पालिका प्रशासन व कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधून सुद्धा लक्ष दिले जात नाही. त्यामुळे संतापलेल्या श्री. जाधव यांनी आज अनोखी शक्कल काढत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी थेट समाज मंदिर परिसरात असलेल्या ४० फुट टाकीवर चढून आपले आंदोलन सुरू केले. त्यांच्या म्हणण्यानुसार गेले महिनाभर लोकांच्या तक्रारींमुळे मी हैराण झालो. समाज मंदीर, मोरडोंगरी, गरड परिसरात पाणीच येत नाही. याबाबतची तक्रार पालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आला. त्यामुळे आज या ठिकाणी येऊन थेट टाकीवर चढून बसलो. यावेळी पाहिले असता १ लाख हजार क्षमता असलेल्या टाकीत १० हजार लिटर सुद्धा पाणी भरलेले नाही. त्यामुळे लोकांना पाणी मिळणार कसे० अशी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आपण माघार घेणार नाही, असे त्यांनी सांगितले. या आंदोलनची माहीत मिळताच मुख्याधिकारी सागर साळुंखे, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सुरेश भोगटे, पांडुरंग नाटेकर, दिपक म्हापसेकर, रवी जाधव यांच्यासह पालिका कर्मचारी यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. मुख्याधिकारी साळुंखे यांनी आजपासून १ लाख लिटर पाणी टाकीत सोडण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर श्री. जाधव यांनी आपले आंदोलन स्थगित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com