कणकवली : खारेपाटण मुसळधार

कणकवली : खारेपाटण मुसळधार

kan166.jpg
84103
खारेपाटण : परिसरात जोरदार पावसामुळे बाजारपेठेलगतच्या तळगावकर यांच्या घरामध्ये पाणी शिरले. (छायाचित्र : रमेश जामसंडेकर)

खारेपाटणला पावसाने झोडपले
- अपूर्ण रस्त्यामुळे बाजारपेठेत चिखल
खारेपाटण, ता. १६ : दुपारी अडीचनंतर खारेपाटण शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. सुमारे अर्धातास मुसळधार पाऊस झाल्‍याने बाजारपेठेसह संपूर्ण खारेपाटणमध्ये पाणीच पाणी अशी स्थिती होती. तर बाजारपेठ रस्त्याचे काम अपूर्ण असल्‍याने बाजारपेठेतही चिखलाचे साम्राज्‍य होते. अचानक जोरदार पाण्याचा प्रवाह आल्‍याने बाजारपेठ परिसरातील तळगावकर यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरले. तर बाजारपेठेतील आंबे व इतर विक्रेत्‍यांचीही मोठी धावपळ उडाली.
खारेपाटण शहर व परिसरात दुपारी अडीच वाजता ढग दाटून आले. त्‍यानंतर जोरदार वादळी वारे सुटले. तर दुपारी तीन वाजल्‍यापासून मेघगर्जनेसह मुसळधार सरी कोसळल्‍या. अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस आल्‍याने व्यापारी विक्रेत्‍यांची धावपळ उडाली. तर नागरिकांनी मिळेल त्‍या दुकानामध्ये जाऊन आडोसा शोधला होता. तळगावकर यांच्या घरात पाणी शिरल्‍याने अन्नधान्य, तसेच इतर वस्तूंचेही नुकसान झाले. तर रस्त्यालगतचे मातीचे भराव बाजारपेठेत आल्‍याने संपूर्ण बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्‍य तयार झाले. ठिकठिकाणी वीज तारांवर झाडे कोसळल्‍याने सायंकाळी उशिरापर्यंत खारेपाटण शहर व परिसराचा वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com