सुधारित बातमी २ महिला जागीच ठार

सुधारित बातमी २ महिला जागीच ठार

८४१३१
मिक्सरखाली सापडून
दोन महिला जागीच ठार
शृंगारतळीनजीक दुर्घटना ः टायर फुटून टेम्पो उलटला
गुहागर, ता. १६ : स्लॅबच्या मिक्सर मशीनखाली चिरडून दोन महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शृंगारतळीतील एका वळणावर बरमारे नर्सरीजवळ घडली. टेम्पोचा टायर फुटून तो उलटला. मिक्सर टेम्‍पोत असल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी चालक साहेबराव अण्णासाहेब मल्लापा हरिजन (रा. विजापूर, सध्या रा. खेर्डी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
चिपळूण खेर्डीहून येणारा टेम्पो स्लँब टाकण्यासाठी लागणारे मिक्सर मशीन व कामगारांना घेऊन गुहागरकडे जात होता. सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास तो शृंगारतळी बरमारे नर्सरीजवळ एका वळणावर आला. हे वळण माहीत असूनही तो बेदकारपणे वाहन चालवत होता असे अपघात पाहणाऱ्यानी सांगितले. याच दरम्यान, अचानक टेम्पोचा मागील टायर फुटला व तो विरुद्ध दिशेला उलटला. या टेम्पोत चालकासह ११ कामगार होते. यामध्ये काही महिला होत्या. टेम्पो उलटल्यावर पुरुष कामगारांनी बाहेर उड्या मारल्या, मात्र पार्वती विठ्ठल मानसुंगी पाटील (वय ४७) व कविता गंगाराम राठोड (वय ३०, मूळ गाव विजापूर, सध्या खेर्डी) या दोन महिला टेम्पोमध्येच अडकल्याने त्यांच्या छातीवर मिक्सर मशीन पडले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत होऊन त्या जागीच मृत झाल्या.
हे सर्व कामगार खेर्डी येथील पटेलनामक ठेकेदाराकडे कामाला होते. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस उपनिरीक्षक मोहिते तेथे दाखल झाले. अपघातग्रस्त टेम्पो जेसीबी व क्रेश सहाय्याने बाहेर काढून येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच रुग्णवाहिका बोलावून दोन महिलांचे मृतदेह चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुजित सोनावणे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com