दुचाकी-एसटी धडकेत दोघांचा मृत्यू

दुचाकी-एसटी धडकेत दोघांचा मृत्यू

swt1625.jpg व swt1626.jpg
84133, 84134
मालवणः अपघातग्रस्त दुचाकी व एसटी बस.

मालवण-कसाल मार्गावर
अपघातामध्ये दोन ठार
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६ : दुचाकी व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल (ता. १५) रात्री आनंदव्हाळ येथे घडली. गणेश कृष्णा निकम (वय-३० रा. पोईप), राकेश पवार (वय-३०, रा. कुंभारमाठ) अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची नोंद येथील पोलीसात झाली असून गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारः मालवण-कसाल मार्गांवर आनंदव्हाळ भगवती हॉटेल नजीक वळणावर मालवणच्या दिशेने येणाऱ्या रत्नागिरी मालवण (एमएच २० बीइल ३१८५ ) या बसला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकी (एमएच ०७ एक्यू २५६८) ची धडक बसली. एसटी बसला एका बाजूला धडक देऊन दुचाकी रस्त्यावर कोसळली. दुचाकीवर बसलेले तिघेही जण रस्त्यावर कोसळले. एसटी चालक, वाहक तसेच स्थानिक ग्रामस्थ यांनी धाव घेतली. रुग्णावाहिकेला बोलावून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मालवण पोलीस व एसटी प्रशासन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
अपघाताचा पंचनामा करण्यात आला. गंभीर जखमी दुचाकी चालक गणेश निकम यांचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी राकेश पवार याचा आज सकाळी मृत्यू झाला. सुनील शिवराम पवार (वय-२५, रा. कोटकामते, देवगड) या जखमी तरुणावर गोवा येथे उपचार सूरू आहेत, अशी माहिती पोलिसांच्यावतीने देण्यात आली. भरधाव वेगात दुचाकी चालवून अपघातात स्वतःच्या मृत्यूस तसेच दुचाकीवरील अन्य एका व्यक्तीच्या मृत्यूस व एका व्यक्तीच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com