स्थानिक एसआयएलसी

स्थानिक एसआयएलसी

इन्स्टंट मसाले, प्रीमिक्स व चटणी कार्यशाळा
कोल्हापूर, ता. १६ : सध्याच्या धावपळीच्या युगात इन्स्टंट फूडला बाजारपेठेमध्ये खूप मागणी आहे. हे लक्षात घेऊन इन्स्टंट मसाले, प्रीमिक्स व चटणी तयार करण्यास शिकवणारी दोन दिवसीय प्रात्यक्षिकावर आधारित कार्यशाळा २२ व २३ मे रोजी कोल्हापूर येथील ‘सकाळ’ कार्यालयात आयोजिली आहे. रेडी टू कूक मसाले आणि ग्रेव्ही यामध्ये इन्स्टंट पनीर मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मिसळ मसाला, महाराष्ट्रीयन ग्रेव्ही, हैदराबादी ग्रेव्ही, व्हाईट ग्रेव्ही, मालवणी ग्रेव्ही, फिश फ्राय मसाला, चायनीज ग्रेव्ही, जैन स्पेशल ग्रेव्ही, चायनीज ग्रेव्ही हे पदार्थ शिकवले जातील. इन्स्टंट रेडी टू कूक मसाले व नावीन्यपूर्ण ग्रेव्ही यामध्ये इन्स्टंट पीठे व प्रीमिक्स शिकवले जातील. ज्यामध्ये डोसा, इडली, गुलाब जामून, आईस्क्रीम, ढोकळा, रबडी, शाही खीर, मसाले भात, दाल खिचडी, थालीपीठ, चकली भाजणी हे पदार्थ शिकवले जातील. नावीन्यपूर्ण व्यावसायिक चटणी यामध्ये सोलापुरी स्पेशल शेंगदाणा, स्पेशल खोबरा, लसूण, कढीपत्ता, कारळ, थ्री इन वन, स्पेशल टोमॅटो, जवस, कोर्टा, चिंच, साऊथ इंडियन पोडी हे चटणीचे प्रकार शिकवले जातील.

वरील दोन्ही कार्यशाळा सशुल्क असून अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क ः ९३५६९७३४२७.
ठिकाण : ‘सकाळ’ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com