

अन्नद्रव्याधारित योजनेत
खतांसाठी अनुदान लागू
रत्नागिरी, ता. १९ः रासायनिक खतांवर अन्नद्रव्याधारित अनुदान योजनेंतर्गत खरीप २०२४ साठी १ एप्रिल २०२४ पासून ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांसाठी अन्नद्रव्याधारित योजनेअंतर्गत अनुदान लागू केलेले आहे.
खत उत्पादक, आयातदारांमार्फत शेतकर्यांना अनुदानित किमतीत युरिया, फॉस्फरस व पोटॅशयुक्त खतांच्या २८ ग्रेडची खते उपलब्ध करून दिलेली आहेत. फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांवरील अनूदान रासायनिक खतांवर अन्नद्रव्याधारित अनुदान योजनेद्वारे नियंत्रित केले जाते. शेतकर्यांना परवडणाऱ्या किमतीत खते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने खत कंपन्यांना मंजूर दरानुसार अनुदान दिले जाते. यंदाच्या खरीप २०२४ साठी रासायनिक खतांवर अन्नद्रव्याधारित अनुदान योजना धोरणांतर्गत फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतामध्ये समाविष्ट असलेल्या नायट्रोजन, फॉस्फरस (झ), पोटॅश (घ) आणि सल्फर (ड) या अन्नद्रव्यांवर प्रति किलो अनुदान मंजूर केले आहे.
२०२४ च्या खरीप हंगामासाठी फॉस्फेटिक खतांवरील अनुदान २०२३ च्या रब्बी हंगामात प्रति किलो २०.८२ रुपये होते ते वाढवून २८.७२ रुपये प्रति किलो करण्यात आले आहे. २०२४ खरीप हंगामासाठी नायट्रोजन, पोटॅशिक आणि सल्फरवरील अनुदान अपरिवर्तित ठेवले आहे. अनुदानामुळे, सध्या १, ३५० रुपये प्रति बॅग विकल्या जाणाऱ्या डीएपीची डाय-अमोनिअम फॉस्फेट किंमत आगामी २०२४ खरीप हंगामासाठी अपरिवर्तित राहील. म्युरेट ऑफ पोटॅशची (एमओपी) उपलब्धता १,६७० रुपये प्रति बॅग आणि एनपीकेची किंमत प्रति बॅग १,४७० रुपये राहिल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.