

१६ (टूडे २ साठी)
- rat२०p५.jpg-
२४M८४६७२
तुळशी : राजर्षी शाहू नगर तुळशी येथे आयोजीत आरोग्य शिबीर तपासणीचा लाभ घेताना नागरिक.
आरोग्य शिबिरातून सामाजिक बांधिलकी
तुळशीतील सम्यक फाऊंडेशन ; राष्ट्रीय महापुरुषांची जयंती कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २१ ः सम्यक फाऊंडेशनतर्फे तुळशी येथील राजर्षी शाहू नगर येथे मोफत आयोजित केलेल्या आरोग्य शिबीरामधुन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. राष्ट्रीय महापुरुषांचे संयुक्त जयंती कार्यक्रमानिमीत्त सामाजिक, आरोग्य व सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले.
सम्यक पाउंडेशनतर्फे धम्म ध्वजवंदन, धम्मसंस्कार विधी, धम्मदेसना व विविध कला गुणदर्शन कार्यक्रम १४ मे रोजी घेण्यात आले. १५ मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पणदेरी यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिरात रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, थायरॉईड, कोलेस्टॉल, किडीनी व लिव्हीर फक्शन, डोळ तपासणी, किशोरवयीन मुलींची तपासणी, व हिमोग्लोबीन तपासणी अशा तपासण्या करण्यात आल्या. तसेच मोफत चष्म्यांचेही वाटप केले गेले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ व सम्यक वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवा विचारवंत सिद्धार्थ शिनगारे, सुरेश भायजे उपस्थित होते. रात्री बुध्द भिम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश जाधव, स्वागत अध्यक्ष संतोष जाधव, देवीदास जाधव होते. प्रास्तावीक अनमोल जाधव, सुत्रसंचालन शांताराम पवार, सलोनी जाधव, आभार सतिष पवार, अतूल जाधव यांनी मानले. कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक, प्रशासन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. आरोग्य शिबिरातून जपलेल्या सामाजिक बांधिलकीचे परिसरातून कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.