

खेडमध्ये ‘अंनिस’तर्फे मार्गदर्शन
खेड : कोकणात अनेक गावांमध्ये सामाजिक बहिष्कार टाकण्याचे व देवदेवस्कीचे प्रकार सुरू असतात. पण सगळ्यांना याबाबत असलेल्या कायद्याची माहिती नसते. तर काही ठिकाणी ते जाणून घेण्याची मानसिकता नसते. आम्ही जादूटोणा विरोधी कायदा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहोत, असे प्रतिपादन अंनिसच्या प्रमुख मुक्ता दाभोलकर यानी केले.
येथील पोलिस ठाण्यात नुकतेच जादूटोणाविरोधी कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने मुक्ता दाभोलकर यांनी खेड पोलिस ठाणे येथे पोलिसपाटील व पोलिस यांना व नागरिकांना जादूटोणा विरोधी कायद्यासंबंधी मार्गदर्शन केले व नागरिकांच्या तक्रारी समस्या जाणून घेतल्या. त्या म्हणाल्या, ‘‘पोलिस व पोलिसपाटील यांना या कायद्याची माहिती देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे चांगले सहकार्य लाभत आहे. जिल्ह्यामध्ये सर्व पोलिस ठाणे येथे जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा या दोन कायद्यांबाबत जनजागृती आम्ही करत आहोत.’’
---
खेडमध्ये नुकसानीचे पंचनामे करा
खेड : तालुक्यासह शहरामध्ये झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे लोकांच्या घरावरील, बिल्डिंगवरील पत्रे तसेच झाडे पडून अतोनात नुकसान झाले आहे. त्वरित सदर पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदन देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. खेड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.