

१२ (टुडे २ साठी)
- rat२१p१.jpg-
P२४M८४८९२
रत्नागिरी : रोटरी वुमेन्स फेस्टमध्ये फॅशन शोमध्ये सहभागी झालेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
विद्यार्थींनींनी साकारला फॅशन शो
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था; अभ्यासक्रमाची दिली माहिती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या टेक्स्टाईल अँड फॅशन डिझाईन डिप्लोमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी व बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या फॅशन डिझाईन डिप्लोमाच्या विद्यार्थिनींनी अनोखा फॅशन शो सादर केला. माळनाका येथील मराठा भवनात रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्यावतीने महिलांसाठी वुमेन्स फेस्ट, उद्योग व्यवसाय प्रदर्शनात हा शो दाखवण्यात आला.
विद्यार्थिनींनी अभ्यासक्रम शिकताना स्वतः डिझाइन केलेले व शिवलेले ड्रेस परिधान केले होते. बारावीनंतर दोन वर्षांचा एसएनडीटी विद्यापीठ मान्यताप्राप्त डिप्लोमामधील त्या विद्यार्थिनी आहेत. या प्रदर्शनात डिप्लोमा इन टेक्स्टाईल अँड फॅशन डिजाईन विद्यार्थिनींनी स्वतः डिझाइन केलेले व शिवलेले विविध ड्रेस, पर्स, पिशव्या, ब्लॉक प्रिंट केलेले टी शर्ट, बांधणीचे ड्रेसेस आणी अभ्यासक्रमांत वर्षभरात बनवलेले विविध डिझाईन्स आदी प्रदर्शीत करण्यात आले होते. तसेच बीसीए, नर्सिंग, बाया कर्वे कौशल्य विकास केंद्र, डिप्लोमा फॅशन डिझाईन आदी विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली. या स्टॉलला शहरातील विविध मान्यवरांनी आवर्जून भेट देऊन संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थिनींना प्रोत्साहीत केले तसेच अशा उद्योग प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन विद्यार्थिनींनी बनवलेले ड्रेसची विक्री करावी, असे सुचवले.
फॅशन-शोसाठी फॅशन डिझाईन विभाग प्रशिक्षक सुरभी साखळकर, वृषाली नाचणकर, ब्युटी पार्लर प्रशिक्षक श्रद्धा आयरे व अनुजा अधिकारी, बीसीए कॉलेजच्या प्र. प्राचार्या कु. स्नेहा कोतवडेकर, रत्नागिरी प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत प्रकल्प प्रमुख मंदार सावंतदेसाई, प्रसन्न दामले, सर्व स्थानिय व्यवस्थापन समिती सदस्य आदींचे मार्गदर्शन लाभले. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष भुर्के यांच्यासह ज्येष्ठ रोटरी सदस्य, पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.