अगोट खरेदीसाठी देव्हारे बाजार फुल्ल

अगोट खरेदीसाठी देव्हारे बाजार फुल्ल
Published on

१३ (टूडे २ साठी)

- rat२१p७.jpg, rat२१p८.jpg-
२४M८४९२६, २४M८४९२७
देव्हारे : आठवडा बाजारात सुकी मासळी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

ओगोट खरेदीसाठी देव्हारे बाजारात गर्दी

सुकी मासळीला मागणी; चाकरमान्यांचा बाजारात राबता, व्यावसायिकांच्या उलाढालीत वाढ

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड, ता. २१ ः तालुक्यात आगोटीच्या कामाची लगबग सुरु झाली असून मसाले, सुकी मच्छी, प्लास्टिक खरेदीसाठी मंगळवारी (ता. ११) देव्हारे आठवडा बाजारात नागरिकांनी गर्दी केल्यामुळे बाजार फुल्ल झाला होता. सुकी मासळीला प्रचंड मागणी असल्यामुळे दर काही अंशी वाढलेले होते. परतीच्या प्रवासाला निघालेला मुंबईकर चाकरमानी देव्हारेसह मंडणगड, कुंबळे, म्हाप्रळ येथील आठवडा बाजारात खरेदी करत होते. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली.

महागाईमुळे बाजारातील सर्वच वस्तुंचे दर वाढलेले आहेत. पावसापुर्वी सुकी मच्छी, तीखट, मीठ-कांदे, अगदी लाकूड फाटा चार महिन्यांकरता साठवून ठेवण्याची मानसीकता आजही कायम आहे. पावसाळ्यातील गरम मसाल्याची बेगमी म्हणून गावठी आणि घाटी मिरची कुटून उत्कृष्ट, तिखट व रुचकर मसाले करण्याच्या तयारीला वेग आला आहे. बाजारात मसाल्यासह सर्व वस्तू तयार मिळत असल्या तरीही अनेक घरांत अजुनही पारंपरिक पद्धतीनुसार मसाला बनवतात. पावसाचे कालावघीत इंधन व खाद्य पदार्थाची अडचण निर्माण होवू नये याकरिता पुर्वापार चालत आलेल्या आगोटीसाठी शहर व परिसरातील गावातील महिलांची धावपळ सुरु झाली आहे. पावसाची चाहूल लागण्याआधी पंधरा ते वीस दिवस आगोटच्या तयारीस तालुक्यात सुरुवात होते. याकरिता सुकी लाकडे, मसाले व तिखट, सुकी मासळी यांची आपल्या गरजेनुसार साठवणूक केली जाते. शहरात तिखट व मसाले तयार करणाऱ्या चक्यामध्ये मिरची पावडर तयार करण्यासाठी गेल्या चार पाच दिवसांपासून महिला वर्ग विशेष गर्दी करताना दिसून येत आहेत. गणपतीपर्यंत अन्नधान्य, मसाल्याचे पदार्थ, सुकी मासळी व इंधनाची कमतरता भासू नये याकरिता विशेष काळजी घेतली जात आहे. सुकी लाकडे निट रचून ठेवली जात आहेत. तसेच आगामी चार-पाच महिन्यांसाठी लागणारी सुकी मासळी, मिरची पावडर, गोड व तिखट मसाले बनवून घेतले जातात.

महिलांकडून विशेष काळजी...
आगामी चार ते पाच महिन्यांसाठी महिला वर्ग विशेष काळजी घेतो. यंदा मिरची तसेच गोड व तिखट मसाल्यांचा भाव अधिक असल्याने तसेच अति उष्णतेमुळे पावसाचे संकेत मिळत असल्याने महिला वर्ग आगोटचे तयारीस लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com