गोळप रस्त्याची दुरवस्था

गोळप रस्त्याची दुरवस्था
Published on

१८ (टुडे पान २ साठी)


-rat२१p९.jpg-
२४M८४९३१
पावस ः गोळप वडपिंपळ देवस्थान ते गार्डीवाडी बापट यांच्या घरादरम्यानच्या रस्त्याची झालेली दूरवस्था.
-----------

गोळप वडपिंपळ देवस्थान रस्त्याची दुरवस्था

पावस, ता. २१ ः रत्नागिरी तालुक्यातील गोळप वडपिंपळ देवस्थान ते गार्डीवाडी बापट यांचे घर या दरम्यान रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून आश्वासन देऊनही रस्त्याचे नुतनीकरण करण्यात आलेले नाही. तातडीने रस्त्याचे नुतनीकरण करावे, अन्यथा पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरून वाहने चालवणे कठीण बनणार आहे.
या मार्गावरील रस्त्यावरील डांबरीकरणाची खडी पूर्णपणे उदध्वस्त झाली असून वाहनचालकांना व पादचाऱ्यांना या मार्गावरून प्रवास करणे कठीण बनले आहे. या रस्त्याच्या नुतनीकरणाबाबत निवडणुकीपूर्वी आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्याप या रस्त्याच्या कामाकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या रस्त्याची अवस्था बिकट होत आहे. पाऊस पडण्यापूर्वी या रस्त्याचे नुतनीकरण न केल्यास पावसाळ्यामध्ये पादचाऱ्यांना वाहनचालकांना या रस्त्यावरून चालणे कठीण बनणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com