आचारसंहितेमुळे विविध विकासकामे ठप्प ः तेली

आचारसंहितेमुळे विविध 
विकासकामे ठप्प ः तेली
Published on

84935

आचारसंहितेमुळे विविध
विकासकामे ठप्प ः तेली

शिथिलतेबाबत वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने वर्क ऑर्डरशिवाय विकास कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे राज्यातील निवडणुकीचा टप्पा पार पडल्याने आणि निकाल चार जूनला असल्याने आचारसंहिता शिथील करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे माजी आमदार राजन तेली यांनी केली आहे.
श्री. तेली यांनी याबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. त्यात म्हटले आहे, की ‘‘लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जूनला होणार आहे. राज्यातील निवडणुकीचा विचार करता निवडणुकीचे टप्पे पूर्ण पार पडले आहेत. परंतु, निवडणुकीची आचारसंहिता असल्याने विकासकामे करण्यास अडचण निर्माण झाली आहे. बरीच कामे वर्क ऑर्डर न मिळाल्याने सुरूही करता आलेली नाहीत. कोकणातील पावसाचा विचार करता ही कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी न झाल्यास अनेक समस्या निर्माण होणार आहेत. ती होण्याच्या दृष्टीने व राज्यातील संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील मतदान पूर्ण झाल्याने आचारसंहिता शिथिल करावी, असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com