-राजापूरचा नैसर्गिक आपत्ती कृती आराखडा

-राजापूरचा नैसर्गिक आपत्ती कृती आराखडा
Published on

२ (टुडे पान १ साठी)


-rat२१p१०.jpg-
२४M८४९३०
राजापूर ः पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने फायबर बोटीची प्रात्यक्षिकाद्वारे तपासणी करताना मुख्य लिपीक जितेंद्र जाधव आणि पालिका कर्मचारी.
-----------

राजापूरचा नैसर्गिक आपत्ती कृती आराखडा

पालिका सज्ज ; फायबर बोटीचे प्रात्यक्षिक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २१ ः पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. पालिकेने मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संभाव्य नैसर्गिक आपत्ती कृती आराखडा तयार केला आहे. आपत्तीच्या काळामध्ये लोकांशी संपर्क साधण्यासह निर्माण झालेली आपत्ती दूर करण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत राहणार आहे. आपत्तीच्या काळामध्ये उपयुक्त ठरणाऱ्‍या फायबर बोटीचीही प्रात्यक्षिकाद्वारे तपासणी करण्यात आली आहे.
अतिवृष्टी झाल्यास शहरातून वाहणाऱ्‍या अर्जुना आणि कोदवली नद्यांना दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती असते. दरवर्षीच्या या स्थितीमध्ये फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे शहरातील संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी नगर पालिका मुख्याधिकारी श्री. भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन सज्ज झाले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील गटारांची साफसफाई करताना पालिकेने संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी संभाव्य नैसर्गिक आपत्ती कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामध्ये आपद्काळामध्ये लोकांना विविध स्वरूपाचे मदत करणाऱ्‍या लोकांसह आपत्काळात करावयाच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. आपत्काळात लोकांना सतर्क करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे भोंगा वाजविण्याचेही नियोजन करताना पूरस्थितीमध्ये अडकणाऱ्‍या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. आपत्तीच्या काळामध्ये लोकांशी संपर्क साधण्यासह निर्माण झालेली आपत्ती दूर करण्यासाठी नियंत्रण कक्ष पुढील महिन्यापासून सुरू करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. या नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत राहणार असून त्यादृष्टीने अधिकारी आणि कर्मचाऱ्‍यांच्या ड्युटीचे नियोजनही करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आपत्तीच्या काळामध्ये उपयुक्त ठरणाऱ्‍या फायबर बोटीचीही प्रात्यक्षिकाद्वारे तपासणीही नुकतीच करण्यात आली आहे. त्यामुळे फायबर बोट सुस्थितीमध्ये असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्‍यांसह माजी पदाधिकारी, स्वयंसेवक यांच्यासह २६ लोकांचा समावेश आहे.
--------

आपत्काळात उपलब्ध सुविधा
नगर पालिका सुरक्षा बोट ः २
खासगी सुरक्षा बोट ः २
जेसीबी ः २
लाईफ जॅकेट ः १०
पोहण्यासाठी गोल रिंग ः ७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com