

विजेच्या समस्येमुळे
पर्यटकांची गैरसोय
मालवण ः कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे वायरी भूतनाथ येथील पर्यटन व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत. महिनाभरापासून सततच्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. गेल्या महिनाभरापासून वायरी भागात सततच्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याला पर्यटन व्यावसायिकांना तोंड द्यावे लागत आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स आणि ‘होम स्टे’ आहेत. या माध्यमातून येथील स्थानिकांनी पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे ए.सी. आणि पंखे काम चालत नसल्याच्या तक्रारी पर्यटकांकडून केल्या जात आहेत. ठरल्याप्रमाणे ए.सी.ची सुविधा मिळत नसल्यामुळे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये वाद निर्माण होत आहेत. पर्यटन व्यवसायामुळे वाढत्या विजेची मागणी लक्षात घेता उपलब्ध ट्रान्सफॉर्मरवरून होणारा वीजपुरवठा कमी पडत आहे. नव्याने अतिरिक्त २०० के.व्ही.चे ट्रान्सफॉर्मर बसविणे गरजेचे आहे.
.................
मंगला एक्स्प्रेस
उद्या विलंबाने
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावरील सावर्डा ते भोके या स्थानकांदरम्यान ‘मेंटेनन्स’चे काम शुक्रवारी (ता. २४) करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी ७ ते ९.३० या वेळेत अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. त्याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गुरुवारच्या (ता. २३) एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस (१२६१७) या गाडीवर होणार आहे. ही गाडी मडगाव ते रत्नागिरी या दरम्यान १ तास ५० मिनिटे थांबविण्यात येणार असल्याने पुढे विलंबाने धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.
---
तेंडोली येथे आज
दशावतारी नाटक
कुडाळ ः तेंडोली येथील न्हाणीचा होळकर देवस्थान येथे उद्या (ता. २२) कै. सिंदू वरक मंडळ, खानोलीतर्फे वार्षिक उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता श्रींची महापूजा, आरती, प्रसाद, सायंकाळी ७ वाजता खानोलकर दशावतार मंडळाचे (खानोली) नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तेंडोलीवासीयांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.