आचरा न्यू इंग्लिश स्कूलचे बारावी परीक्षेत उज्वल यश

आचरा न्यू इंग्लिश स्कूलचे
बारावी परीक्षेत उज्वल यश
Published on

84953

आचरा न्यू इंग्लिश स्कूलचे
बारावी परीक्षेत उज्वल यश

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २१ ः धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचराचा बारावीच्या निकालात आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. कला विभागात प्रविष्ठ ४३ विद्यार्थ्यांपैकी ४२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९७.६७ टक्के निकाल लागला.
वाणिज्य विभागात प्रविष्ठ ९२ पैकी ९१ विद्यार्थी पास होऊन प्रशालेचा निकाल ९८.९१ टक्के लागला. कला विभागात मिस्बा काझी ८९.८३ टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली. द्वितीय सानिया मळगी हिने ८८.५० टक्के गुण मिळविले. विशाल परशुराम धुरी यांनी ८०.१७ टक्के गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. वाणिज्य विभागात संजना पवार ८८.१७ टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली. द्वितीय निर्झरा मालंडकर ८७.३३ टक्के गुण मिळविले. अल्फीजा मुजावर ८५.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे धी आचरा पीपल्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब-मिराशी, सचिव अशोक पाडावे तसेच सर्व समिती सदस्य, स्थानिक स्कूल कमिटीच्या निलीमा सावंत, राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर, बाबाजी भिसळे, रघुनाथ पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com