

खारेपाटण कनिष्ठ महाविद्यालयाचा
बारावीचा ९५.२३ टक्के निकाल
सकाळ वृत्तसेवा
खारेपाटण,ता. २१ ः येथील कनिष्ठ महाविद्यालय खारेपाटणचा बारावीचा निकाल ९५.२३ टक्के लागला. प्रशालेच्या विज्ञान, कला, वाणिज्य आणि अकाउंटन्सी अँड ऑफिस मॅनेजमेंट या शाखांचा तसेच इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी या शाखेचा शंभर टक्के निकाल लागला. तर ऑटो टेक्नॉलॉजी या शाखेचा ९३.१० टक्के निकाल लागला आहे.
प्रशालेच्या विज्ञान शाखेतून फिझ्झा इरफान मुल्ला ५२० गुण, धनश्री शंकर शेटये ४८७ गुण, दीक्षा राजेंद्र चिके हिने ४६१ गुण पटकावले आहेत. कला शाखेतून प्रियांका गुरव ५१० गुण, रुणाली जुवाटकर ४७३ गुण, अस्मिता कदम ३९३ गुण मिळवले आहेत. विज्ञान शाखेतून गिरीश इंगळे ४७४ गुण, गौरव कुडाळकर ४६४ गुण आणि सारिका राणे हिने ४५८ गुण मिळवले आहेत. इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी विभागातून ओमकार सुनील दिवेकर, ऑटो टेक्नॉलॉजी मधून संदेश मंगेश कुडकर आणि ऑफिस मॅनेजमेंट विभागातून प्राची घाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.