

४ (टुडे पान १ साठी)
-rat२१p३.jpg-
P२४M८४८९४
रत्नागिरी ः सायबर क्राईम या लघुपटात चित्रीकरणावेळी उपस्थित कलाकार अॅड. नकुल नाडकर्णी, तेजस्विनी जोशी आणि डॉ. रोजा भुर्के आदी.
------
''सायबर क्राईम'' लघुपटाचे चित्रीकरण
गोविंद फिल्मसची निर्मिती ; ऑनलाईन फसवणुकीवर जनजागृती
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः मी बॅंकेतून बोलतोय.. तुमचे एटीएम कार्डची मुदत संपली आहे. लॉटरीचे तिकीट लागले आहे.. व्यवसाय, नोकरी अशा आमिषाला व फसवणुकीला अनेकजण बळी पडतात.. ऑनलाईन फसवणूक ही सर्रास होत असताना दिसत आहे. लोकांनी सजग व्हावे, जनजागृती व्हावी यासाठी गोविंद फिल्मसने सायबर क्राईम हा लघुपट रत्नागिरीत चित्रीत केला असल्याची माहिती लघुपटाचे लेखक अॅड. नकुल नाडकर्णी यांनी दिली.
अॅड. नाडकर्णी यांचे कुडाळ हे मुळ गाव. मात्र शिक्षण आणि नोकरी निमित्त ते रत्नागिरीत वास्तव्यास आहेत. आजवर त्यांनी टुवर्डस द हेल्दी लाईफ स्टाईल, सार्थक, रक्षाबंधन असे तीन लघुपट तयार केले आहेत. त्यातील रक्षाबंधन आणि सायबर क्राईम या लघुपटाचे चित्रकरणही रत्नागिरीत झाले. तीन दिवस चाललेल्या या लघुपटाचे चित्रकरण डॉ. पानवलकर बंगला, सीए उज्वल बापट, मंदार जोशी, सागर दर्शन अपार्टमेंट थिबा पॅलेस, लक्ष्मण विचारे बंगला, महेंद्र पाटणकर यांचे घर, मुकादम हॉस्पिटल रेल्वे स्टेशन रोड आणि कृषी उत्पन्न बाजार समिती नाचणे येथे झाले. ऑनलाईन फसवणुकीसाठी चोरटे अनेक शिक्कल वापरत आहे. बॅंकेतून बोलतोय असे सांगून फसवणूक होत आहे. तसेच लॉटरीचे तिकीट, व्यवसाय, नोकरी, रक्कम डबल मिळेल अशी आमिषेही दाखवून लोकांची फसवणूक होत आहे. त्याचा परिणाम काय होतो यावर भाष्य करणारा या लघुपटाच्या कथा अधोरेखित करण्यात आली आहे.
या लघुपटात स्वतः अॅड. नाडकर्णी यांची मध्यवर्ती भूमिका साकारली असून येथील ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. रोजा भुर्के, महेंद्र पाटणकर, विनय घोसाळकर, पक्षीमित्र श्रीकांत ढालकर, विजय पोकळे, कीर्तनकार तेजस्विनी जोशी, केतकी जोशी, शिल्पा सुर्वे, अंकिता नाचणकर, विदुला घाणेकर, स्वरुपा जोशी-पराजपे, मिना खेडकर, अभिनय बामणे, प्रथमेश पाटील, विघ्नेश घाणेकर, प्रसाद कशेळकर, गुरुदेव नांदगावकर, प्रसाद सुर्वे, स्वानंद मयेकर, संदीप जोशी, तेजस खरे, प्रथमेश चव्हाण, शुभम मुसळे, रुतुराज सहस्त्रबुद्धे आदींनी अभिनय केला आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन स्वप्नील राणे यांचे असून डिओपी- प्रथमेश पाटील, शुभम मुसळे, मेकअप- नरेश पांचाळ, वेशभूषा- नितीन ठाकुरदेसाई बाजू संभाळाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा लघुपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.