

84955
जानवली नदीपात्रात ‘हरकूळ’चे पाणी
नदीकाठच्या गावांना दिलासा; पाणी योजना पुन्हा सुरू
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.२१ : जानवली (ता.कणकवली) नदीपात्रात हरकूळ धरणाचे पाणी दाखल झाले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला असून या गावांच्या नळ योजना पुन्हा कार्यान्वित झाल्या आहेत.
यंदा एप्रिल महिन्यातच जानवली नदीपात्र आटल्याने नदीकाठच्या साकेडी, नागवे, करंजे, कोंडये आदी गावांतील नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली होती. त्यामुळे गेल्या महिन्यापासूनच हरकूळ धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी राजकीय लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. त्यानुसार हरकूळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या चार दिवसांत तालुक्यात मॉन्सूनपूर्व सरी कोसळल्या. मात्र या पावसामुळे विहिरींतील पाण्याची पातळी वाढली नव्हती. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या दरम्यानच्या काळात हरकूळ धरणाचे पाणी जानवली नदीत दाखल झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.